मिर्झापूर या सिरीजचा दुसरा सिजन 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या सिरीजमध्ये पहिल्या सिजनमधील अनेक पात्र पुन्हा पाहायला मिळाली. सोबतच काही नवीन पात्रांनीदेखील लोकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकीच एक पात्र म्हणजे माधुरी यादव.
1 / 6
मुन्ना त्रिपाठी (मुन्ना भैय्या) याच्या पत्नीचं माधुरी यादव हे पात्र अभिनेत्री ईशा तलवार हिने साकारलं आहे. ईशाने मिर्झापूरमध्ये केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे, सोबतच ईशाला सर्वजण सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
2 / 6
सिरीजमध्ये एका राजकीय नेत्याच्या मुलीचा रोल करणारी माधुरी यादव साडीत खूप सुंदर दिसली आहे. परंतु सोशल मीडियावर माधुरीचं ग्लॅमरस आणि बोल्ड रुप पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्येत अधिक भर पडली आहे.
3 / 6
अभिनेत्री ईशा तलवार ही अभिनेते-दिग्दर्शक विनोद तलवार यांची मुलगी आहे.
4 / 6
ईशाचा 22 डिसेंबर 1987 ला मुंबईत जन्म झाला. तिला लहानपणापासून नृत्याची आवड असून तिने त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'हमारा दिल आपके पास है' या चित्रपटात ईशाने बालकलाकार म्हणून काम केले होते.
5 / 6
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ईशाने आतापर्यंत तब्बल 40 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.