AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दहा दिवसात 347 रुग्णांची नोंद

कोल्हापुरात दिवसभरात सर्वाधिक 68 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दहा दिवसात 378 रुग्णांची नोंद झाली आहे. (Kolhapur Corona Cases Live Update)

कोल्हापुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दहा दिवसात 347 रुग्णांची नोंद
| Updated on: May 25, 2020 | 7:14 PM
Share

कोल्हापूर : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला (Kolhapur Corona Cases Live Update) आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापुरात दिवसभरात 37 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर काल एका दिवशी 55 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या दहा दिवसात कोल्हापुरात 347 रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काल एका दिवशी 55 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे (Kolhapur Corona Cases Live Update) चिंतेत असतानाच आज पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला धक्का बसला. कोल्हापुरात आज 37 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 378 वर पोहोचला आहे.

कोल्हापुरातील वाढलेले सर्व रुग्ण हे रेड झोनमधून आलेले आहे. त्यामुळे रुग्णांची वाढ ही झपाट्याने होत असल्याने नागरिकांची काळजी वाढली आहे. त्यामुळे जोपर्यंत बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या जोपर्यत कमी होत नाही तोपर्यत हा धोका जिल्ह्यावर कायम असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाऱ्याच्या वेगानं वाढत आहे. गेल्या 15 दिवसात जिल्हातील रुग्णाची संख्या 18 पटीने वाढली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे हॉट्स्पॉट

परिसर – रुग्णसंख्या

शाहूवाडी- 104 राधानगरी- 47 भुदरगड – 47 चंदगड – 25 कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र 20

अशी वाढत गेली रुग्णसंख्या

तारीख – रुग्ण

16 मे -7 17मे – 14 18 मे – 32 19 मे- 53 20 मे- 45 21मे – 46 22मे – 31 23 मे – 27 24 मे – 55 25 मे – 37 10 दिवसात 347 रुग्णांची वाढ

चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यात तपासणी केलेल्या दीड हजारहून अधिक नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. यातील बहुतांशी नमुने हे रेड झोन मधील आलेल्या प्रवाशांचे आहेत. एका बाजूला जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी व्यवहार सुरु झाले आहेत. आजपासून विमानसेवा देखील सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत वाढणारी रुग्णसंख्या जिल्हावासियांची चिंता वाढवत (Kolhapur Corona Cases Live Update) आहे.

संबंधित बातम्या : 

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 156 तर सिंधुदुर्गात 17 रुग्ण

Solapur Corona | सोलापुरात मृतांची संख्या 52 वर, कोरोनाबाधितांची संख्या सहाशेच्या दिशेने

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.