LIVE : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडीच्या सूत्रांची माहिती

LIVE : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडीच्या सूत्रांची माहिती

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट

सचिन पाटील

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 29, 2019 | 12:01 AM

[svt-event title=”अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडीच्या सूत्रांची माहिती” date=”28/10/2019,8:31PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : बालिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडीच्या सूत्रांची माहिती, इकबाल मिरचीच्या साथीदार रंजीत सिंघ बिंद्रा सोबत राज कुंद्रा ह्यांनी व्यावसायिक करार केल्याची ईडी सूत्रांची माहिती, या प्रकरणी ईडीकडून सोमवारी राज कुंद्रा ह्यांची चौकशी [/svt-event]

[svt-event title=”चाक गळून पडल्यानंतरही एसटी 1 किमी धावली” date=”28/10/2019,6:19PM” class=”svt-cd-green” ] बीड: चाक गळून पडल्यानंतरही एसटी 1 किमी धावली, दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे 61 प्रवासी बचावले,पंढरपूर रिसोड मार्गावरील बसची मोठी दुर्घटना टळली, दुचाकीस्वार तरुणांनी पाठलाग करून बस थांबविली, एसटी महामंडळाचा हलगर्जीपणा पुन्हा उघड [/svt-event]

[svt-event title=”नांदेडचे खासदार चिखलीकर अपघातातून थोडक्यात बचावले” date=”28/10/2019,4:29PM” class=”svt-cd-green” ] नांदेड: खासदार प्रताप पाटील चिखलीकर अपघातातून बचावले, लोहा कडे जात असताना भरधाव ट्रक आला कारच्या अंगावर, चालक बालाजी जाधवने रस्त्याच्या खाली गाडी घेतल्याने बचावले खासदार , गाडीत खासदारासह युवा नेते माधव पावडे होते सोबत, ट्रक चा चालक नशेत असल्याचे झाले उघड. [/svt-event]

[svt-event title=”गिरीश महाजनांच्या बंगल्याला नागरिकांचा घेराव” date=”28/10/2019,11:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजित पवार विरोधी पक्षनेते झाले तर आनंदच : दत्ता भरणे” date=”28/10/2019,11:33AM” class=”svt-cd-green” ] अजित पवार विधानसभेत विरोधी पक्ष नेते झाले तर आनंदच, राष्ट्रवादीमध्ये सगळेच सक्षम आहेत, शरद पवार विरोधी पक्ष नेतेबद्दल जे निर्णय घेतील तो मान्यच, इंदापूर मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गहन आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढील पाच वर्ष प्रयत्न करणार – दत्ता भरणे, आमदार, राष्ट्रवादी [/svt-event]

[svt-event title=”माझा आमदार, माझा मुख्यमंत्री, युवासेनेची मोहीम” date=”28/10/2019,10:51AM” class=”svt-cd-green” ] माझा आमदार, माझा मुख्यमंत्री !!, My MLA, my chief minister !!, नवनिर्वाचित आमदारांपाठोपाठ आता युवा सेना पदाधिकाऱ्यांचीही मागणी, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, युवासेना पदाधिकारी अमेय घोले आणि पूर्वेश सरनाईक यांचं सोशल मीडियावर कॅम्पेन [/svt-event]

[svt-event title=”दिवाकर रावते राज्यपालांच्या भेटीला” date=”28/10/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] दिवाकर रावते राजभवनात दाखल, राज्यपालांची दिवाळीनिमित्त भेट. शुभेच्छा देण्यासाठी रावते आले असल्याची राजभवन जनसंपर्क कार्यालयाची माहिती. [/svt-event]

[svt-event title=”जेजुरी गडावर खंडोबाचा पालखी सोहळा” date=”28/10/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] जेजुरी – सोमवती आमावस्यानिमित्त जेजुरी गडावर खंडोबाचा पालखी सोहळा, सकाळी कऱ्हा नदीत खंडोबाला स्नान घालण्यात आले, राज्यभरातून हजारो भाविक जेजुरीत पालखी सोहळ्यात सहभागी, येळकोट येळकोट जय मल्हारचा गडावर जयघोष, खंडोबावर भंडारा आणि खोबऱ्याची उधळण [/svt-event]

[svt-event title=”सेना-भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला” date=”28/10/2019,10:26AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना नेते दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना वेगवेगळे भेटणार, दिवाकर रावते 10.30 वाजता,मुख्यमंत्री 11.00 वाजता घेणार भेट. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट, दोन्ही वेगवेगळ्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या” date=”28/10/2019,10:26AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, गेल्या पाच वर्षांपासून पती राजेंद्र दास हा शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्यानं आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहली चिठ्ठी, रश्मीता दास असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव. पती राजेंद्र दास विरोधात सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात” date=”28/10/2019,10:26AM” class=”svt-cd-green” ] मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात. एक ठार , दोघे गंभीर, फुडमॉलजवळ खोपोली हद्दीमध्ये अपघात. एक ट्रक आणि ट्रेलरच्या अपघातामध्ये नारळ वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळला. ट्रकमधील एक ठार तर दोन जण गंभीर जखमी. डेल्टा फोर्स, देवदुत यंत्रणा , हायवे पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी [/svt-event]

[svt-event title=”बारामतीत दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम” date=”28/10/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ] बारामतीत दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम, शरद पवार आणि कुटुंबीय बारामतीकर आणि राजकीय नेत्यांना भेटतात. कार्यक्रमाला सुप्रिया सुळे , अजित पवार, रोहीत पवार, जय पवार, पार्थ पवार उपस्थितीत, शरद पवारांना भेटण्यासाठी बारामतीकर आणि राजकीय नेत्यांची हजेरी [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें