LIVE | जामखेड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक

Nupur Chilkulwar

| Edited By: |

Updated on: Jan 05, 2021 | 11:50 PM

LIVE | जामखेड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक
Breaking news

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Jan 2021 10:50 PM (IST)

  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

  – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

  – अज्ञात व्यक्तिने फोन करून दिली धमकी

  – धमकी देणाऱ्याने केला अर्वाच्य भाषेचा वापर

  – 22 डिसेंबर रोजी मुंबई महापालिका कार्यलयात असताना दिली गेली होती धमकी

  – 31 डिसेंबर 2020 रोजी आजाद मैदान पोलिस ठाण्यात FIR क्रमांक. 261 / 2020 अन्तर्गत जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल

  – पोलास करत आहे पुढील तपास

 • 05 Jan 2021 10:39 PM (IST)

  जामखेड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक 

  – जामखेड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक – अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाची कारवाई – पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा आणि खाजगी व्यक्ती तुकाराम ढोले यांना 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले – तक्रारदारच्या भावाला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी मागितली होती 50,000 रुपयांची लाच

 • 05 Jan 2021 08:49 PM (IST)

  निंबवली ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अधिकाऱ्यांमध्ये राडा

  भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचयात निवडणूकीत राडेबाजी सुरू, निंबवली ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात राडा, भादवड येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातच कार्यकर्त्यांची एकमेकांना खुर्च्यांसह ठोशा बुक्क्याने मारहाण

 • 05 Jan 2021 08:48 PM (IST)

  3 हजारांची लाच घेताना महापालिकेच्या प्रभाग अधिकारी आणि लिपिक रंगे हात पकडलं

  मालेगाव :- मेडिकल दुकान सुरू करण्याकामी महापालिकेची थकबाकी नसल्याची NOC देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारतांना महापालिकेच्या प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे आणि लिपिक हिरालाल गागडा यांना लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले

 • 05 Jan 2021 07:36 PM (IST)

  तीन वर्षांनंतर माझ्यावर गुन्हा दाखल : गिरीश महाजन

  पुणे : तीन वर्षांनंतर माझ्यावर गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पुण्यात घडला. त्याची तक्रार मध्यप्रदेशाच्या बॉर्डरवर केली. पोलिसांवर दबाव असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली.

 • 05 Jan 2021 07:16 PM (IST)

  तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यावर मंदिर प्रशासनाची कारवाई

  उस्मानाबाद - तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यावर मंदिर प्रशासनाची कारवाई

  - 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी आदेश

  - 16 पुजाऱ्यांना 6 महिने मंदिर प्रवेश बंदी का करू नये याची कारणे दाखवा नोटीस

  - कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार कारवाई

  - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केली प्रवेशबंदी

  - पुजारी अभिजीत कुतवळ, कुलदीप औटी, पंकज कदम, संपत गंगणे, संदीप टोले, लखन भोसले, ओंकार भिसे व आकाश परदेशी या 8 पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी

 • 05 Jan 2021 06:07 PM (IST)

  "शिवसेना म्हणजे नौटकी सेना", "नामांतराचा विषय म्हणजे नाटक": देवेंद्र फडणवीस

  औरंगबादला रस्त्यांसाठी पैसे दिले पण महापालिका वेळेत पैसे खर्च करु शकली नाही. इतकी वर्ष सत्ता राबवल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा काढला जातोय. निवडणुका आल्याकी या गोष्टी का काढल्या जातात. शिवसेनेला अजाण स्पर्धा आठवायला लागली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजराती लोकांची आठवण शिवसेनेला येते.

 • 05 Jan 2021 05:52 PM (IST)

  डिसेंबर महिन्यात रूग्ण दुपटीचा कालावधी पावणे दोनशेवर

  डिसेंबर महिन्यात रूग्ण दुपटीचा कालावधी पावणे दोनशेवर, केवळ 1.74 टक्के रूग्णच ॲक्टिव्ह, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा धोका लक्षात घेऊन आरोग्य त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

 • 05 Jan 2021 05:38 PM (IST)

  नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, नाईकांना रोखण्यासाठी आघाडीचे नेते मैदानात

  नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, गणेश नाईकांना रोखण्यासाठी आघाडीचे नेते मैदानात, निवडणुकीआधी इच्छुक उमेदवार लागले कामाला

 • 05 Jan 2021 05:05 PM (IST)

  येत्या 13 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात

  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. येत्या 13 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटची लस दिली जाणार आहे.

 • 05 Jan 2021 05:02 PM (IST)

  येत्या 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारकडून बजेट मांडलं जाणार, सूत्रांची माहिती

  नवी दिल्ली : येत्या 1 फेब्रुवारी केंद्र सरकारकडून बजेट मांडलं जाणार, सूत्रांची माहिती, बजेटचा दुसरे सत्र 8 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान चालणार, सूत्रांची माहिती

 • 05 Jan 2021 04:52 PM (IST)

  आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर दहा दिवसात लसीकरणाला सुरुवात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

  नवी दिल्ली : कोरोना लसीला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर 10 दिवसात लसीकरणाला सुरुवात करता येणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती,  कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी देशात सिरम आणि भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे.

 • 05 Jan 2021 04:43 PM (IST)

  शिवसेनेच्या ममता दिनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

  मुंबई : स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ उद्या (6 जानेवारी) ममता दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षाचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ममता दिन हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे

 • 05 Jan 2021 04:23 PM (IST)

  मुंबईच्या एंटी नारकोटिक्स सेलची मोठी कारवाई, 106 किलो गांजा जप्त

  मुंबई : मुंबईच्या एंटी नारकोटिक्स सेलची मोठी कारवाई, विक्रोळीतून 106 किलो गांजा जप्त, एकूण 3 आरोपींना अटक, जप्त केलेल्या गांजाची किंमत 21 लाख 20 हजार रुपये, त्यासोबतच एक टेम्पोही जप्त केला आहे. त्यामुळे एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 28 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.

 • 05 Jan 2021 04:18 PM (IST)

  रेल्वे स्थानकातील औरंगाबाद नावाच्या बोर्डाला पोलिसांची सुरक्षा

  औरंगाबाद : रेल्वे स्थानकातील औरंगाबाद नावाच्या बोर्डाला पोलिसांची सुरक्षा, खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा बलाकडून सुरक्षा, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून सुरु असलेल्या वादानंतर सुरक्षेत वाढ, दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद नाव असलेल्या बोर्डाला काळे फासले. त्याऐवजी संभाजीनगरचे फलक लावण्यात आले होते. तसे आंदोलन पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.

 • 05 Jan 2021 04:15 PM (IST)

  देशात चार प्रमुख Vaccine Depot, 36 व्हॅक्सिन स्टोर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयालयाकडून कोरोना लसीकरणाची माहिती

  नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखाने कमी झाली आहे. देशात कोरोना संक्रमण कमी होत आहे. कोरोना संक्रमणपासून दुरुस्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. कोरोना संक्रमण 43.96 टक्के रुग्ण हे रुग्णालयात आहेत. तर 56.04 टक्के रुग्णांवर घरातच उपचार घेत आहेत. कोरोनावर डिजीटल पध्दतीने नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. देशात 4 डेपो असून मुंबईमध्ये प्रमुख व्हॅक्सिन डेपो आहे. तर 36 व्हॅक्सिन स्टोर आहे.

 • 05 Jan 2021 03:14 PM (IST)

  चेन्नईत तुफान पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी

  तामिळनाडू : चेन्नईत तुफान पाऊस, जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी तुंबलं, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी भरल्याने वाहतूक विस्कळीत

 • 05 Jan 2021 03:11 PM (IST)

  संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर

  नाशिक - शिवसेना नेते संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर, भाजपातील दोन बडे नेते शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता, संजय राऊत यांच्या दौऱ्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत,  बाळासाहेब सानप यांच्या पक्ष बदलाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेची रणनीती, राऊत यांच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष

 • 05 Jan 2021 03:00 PM (IST)

  वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

  वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

  आयुक्तसाहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या... अशी घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात राडा घातला... पोलीस आणि शिवसैनिकांनी दोन मनसे कार्यकर्त्यांना बेदम चोप देत कार्यक्रमातून काढले बाहेर.. पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे..

  वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवांचा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळाच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे वसईत आले होते..

 • 05 Jan 2021 02:58 PM (IST)

  मुंबईत ओबीसींची पहिली राज्यव्यापी माहामोर्चा बैठक सुरू

  मुंबईत ओबीसींची पहिली राज्यव्यापी माहामोर्चा बैठक सुरू - ओबीसी, भटक्या विमुक्त समाजीत सगळे नते एकसाथ.. - प्रकाश शेंडगेंच्या नैतृत्वात बैठक सुरू... -मेगाभरती करा नाहीतर मेगा आंदोलन करू, प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा - 20 तारखेला राज्यव्यापी महामोर्चा काढणार असा इशारा...

 • 05 Jan 2021 02:57 PM (IST)

  नागपूरच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी विजयी

  नागपूरच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी विजयी, तिवारी यांना एकूण 151 नगरसेवकांपैकी 107 मतं, काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना 27 मतं, बसपाचे नरेंद्र वालदे यांना 10 मतं, पाच सदस्य अनुपस्थित

 • 05 Jan 2021 02:53 PM (IST)

  महाराष्ट्राचा नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? तीन माजी मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र प्रभारींचं मंथन

  महाराष्ट्राचा नवीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्तीवर आज महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांयकाळी 6:30 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. बैठकीत 3 माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहे.

 • 05 Jan 2021 02:31 PM (IST)

  नवी मुंबईत भाजपला आणखी एक धक्का, नगरसेविकेसह माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

  नगरसेविका दिव्या गायकवाड आणि वैभव गायकवाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दिव्या गायकवाड प्रभाग क्रमांक 64 मधून निवडून आल्या होत्या. गणेश नाईक यांच्यासह गायकवाड भाजपमध्ये गेल्या होत्या.

 • 05 Jan 2021 02:29 PM (IST)

  चंद्रपूर जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

  चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 629 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून यापैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली आहे.

 • 05 Jan 2021 02:28 PM (IST)

  नागपूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे दयाशंकर तिवारी विजयी

  नागपूरच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी विजयी, तिवारी यांना एकूण 151 नगरसेवकांपैकी 107 मतं, काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना 27 मतं, बसपाचे नरेंद्र वालदे यांना 10 मतं,  तर पाच सदस्य अनुपस्थित राहिले.

 • 05 Jan 2021 02:22 PM (IST)

  नामांतर प्रश्नावर सेनेकडून केवळ मतांचं राजकारण, प्रत्यक्ष कृती वेळी औरंगजेबाच्याच धर्तीवर काम, भाजपचा हल्लाबोल

  औरंगाबादच्या सत्ताधारी शिवसेनेने याकडे साफ दुर्लक्ष केलंय आणि आता महापालिकेच्या तोंडावर हे सगळ पुढे करण्यात येतंय ज्यांना करायच आहे ते तातडीनं करू शकतात हे भाजपने दाखवून दिलंय... पण ज्यांना फक्त मतांचं राजकारण करायच आहे ते एवढंच करत आहेत शिवसेनेने प्रत्यक्ष कृतीच्या वेळी औरंगजेबाच्याच धर्तीवर काम केलंय केशव उपाध्ये यांचे गंभीर आरोप

 • 05 Jan 2021 02:18 PM (IST)

  औरंगाबादच्या नामांतराचा फडणवीसांकडून प्रयत्न झाला, शिवसेना तर औरंगजेबाची, भाजपचा हल्लाबोल

  औरंगाबाद नामांतर विषय, केशव उपाध्येंचा सेनेवर हल्लाबोल 1995 ला महापालिकेत नामांतरराचा प्रस्ताव झाला युतीच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी दिली सत्तांतर झाल तेव्हा याच कॅांग्रेसन म्हणजे आत्ता सत्तेत असणार्यांनी हा प्रस्ताव बाजुला केला याच कॅांग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं एकदा नाही तर दोनदा हा प्रस्ताव फेटळला भारतीय जनता पार्टीनं २०१९ ला परत एकदा प्रस्ताव पाठवला होता पण वारंवार प्रस्ताव पाठवून याकडे दखल घेतली नाही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत बाळासाहेबांच स्वप्न होत ते पुर्ण करा अस भाजपच्या नगरसेवकांनी केला होता पण शिवसेनेन हा प्रस्ताव बोर्डवरच आणला नाही शिवसेनेच्या मनात होत तर मग हा प्रस्ताव पुढे का आला नाही भाजपच्या नगरसेवकांनी चार वेळा औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला मात्र औरंगाबादच्या महापौरांनी याबाबत काहीच केल नाही वारंवार स्मरणपत्र देऊनही यात शिवसेनेन असा प्रस्ताव सादर करूच नका अस महापौर सांगत आहेत बोलण एक आणि करन एक देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नामांतराचे प्रयत्न नक्कीच झाले आहेत याबाबतचे पुरावे उपलब्ध आहेत

 • 05 Jan 2021 02:13 PM (IST)

  काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं एकदा नाही तर दोनदा नामांतराचा प्रस्ताव फेटळला : केशव उपाध्ये

  भाजपचे प्रवक्ते औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत आहेत. - १९९५ ला महापालिकेत नामांतरराचा प्रस्ताव झाला - युतीच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी दिली - सत्तांतर झाल तेव्हा याच कॅांग्रेसन म्हणजे आत्ता सत्तेत असणार्यांनी हा प्रस्ताव बाजुला केला - याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं एकदा नाही तर दोनदा हा प्रस्ताव फेटळला - भारतीय जनता पार्टीनं २०१९ ला परत एकदा प्रस्ताव पाठवला होता, पण वारंवार प्रस्ताव पाठवून याकडे दखल घेतली नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत बाळासाहेबांच स्वप्न होत ते पुर्ण करा अस भाजपच्या नगरसेवकांनी केला होता. पण शिवसेनेन हा प्रस्ताव बोर्डवरच आणला नाही शिवसेनेच्या मनात होत तर मग हा प्रस्ताव पुढे का आला नाही.

 • 05 Jan 2021 01:37 PM (IST)

  लोकल संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील : राजेश टोपे

  लोकल संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, कोरोनाची परिस्थिती पाहून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल

 • 05 Jan 2021 01:37 PM (IST)

  गरिबांना लस मोफत देण्यात केंद्राने मदत करावी : राजेश टोपे

  कोरोना लस संदर्भात केंद्राने किमान खर्च करावा, गरिबांना लस मोफत देण्यात केंद्राने मदत करावी, जर केंद्राने तसे केले नाही तर राज्यातील अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, ज्या गोष्टींची कमतरता आहे त्याची माहिती आम्ही केंद्राला सांगितली आहे

 • 05 Jan 2021 01:36 PM (IST)

  सध्या कोरोनाचे 2 ते 3 हजार नवीन रुग्ण दरदिवसा येत आहेत : राजेश टोपे

  सध्या 2 ते 3 हजार नवीन रुग्ण दरदिवसा येत आहेत, पूर्वी हे प्रमाण 25 ते 30 हजार होते, तर रिकव्हरी रेट 96 टक्के आहे, त्यामुळे सर्व नियंत्रणात आहेत, नवीन स्ट्रेनबाबत आम्ही सतर्क आहोत, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला, आम्ही आमच्या प्रोटोकॉलनुसार अंमल बाजावणी कायम ठेवणार, तसे आम्ही केंद्राशी पत्र व्यवहारकरून इतर राज्यात देखिल प्रोटोकॉल कायम राहावा यासाठी सांगण्यात येणार जेणेकरून इतर राज्यातून आपल्या राज्यात रूग्ण संख्या वाढू नये,

 • 05 Jan 2021 01:32 PM (IST)

  संपूर्ण जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्रायरन होणार : टोपे

  संपूर्ण जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्रायरन होणार, टेस्टिंग होईल, त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल तेव्हा कुठलीही अडचण न येता हा सर्व कार्यक्रम राबवता यावा यासाठी हे सर्व सुरु आहे

 • 05 Jan 2021 01:30 PM (IST)

  एक आदर्श नागरिक म्हणून नियम पाळले पाहिजे : राजेश टोपे

  नियम जनहितासाठी आहेत, एक आदर्श नागरिक म्हणून त्यांनी ते पाळले पाहिजे, कायदा हा सर्वांसाठी समान आहे, कायद्याच्या वर कोणीही नाही, याचा विचार करुन सर्वांनी वागलं पाहिजे,

 • 05 Jan 2021 01:28 PM (IST)

  नवीन विषाणू झपाट्याने पसरतो, त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेणं महत्त्वाचं : राजेश टोपे

  नव्या विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली, आणखी 8 रुग्ण आढळले, पुण्यातील लॅबची अहवाल, नवीन विषाणू झपाट्याने पसरतो, त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहणे, काळजी घेणं महत्त्वाचं, पण घाबरण्याची गरज नाही,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

 • 05 Jan 2021 01:22 PM (IST)

  सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे अखेर अटकेत

  सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे अखेर अटकेत, उपयुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मगितल्याप्रकरणी राजेश काळे यांच्यावर दाखल आहे गुन्हा, 29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे होते फरार, पुण्यावरुन पाठलाग करत गुन्हे शाखेने टेंभुर्णी परिसरातून काळे याना घेतलं ताब्यात

 • 05 Jan 2021 12:54 PM (IST)

  एकनाथ खडसेंच्या केससंदर्भात अ‌ॅड.असीम सरोदे यांना ईडी कार्यलयातून फोन

  - एकनाथ खडसेंच्या केससंदर्भात अ‌ॅड.असीम सरोदे यांना ईडी कार्यलयातून फोन,

  - खडसेंच्या केससंदर्भात कागदपत्र तपासकामासाठी ईडीकडून फोन,

  - ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सरोदे यांच्या कार्यालयात येणार,

  - एकनाथ खडसेंच्या केसमध्ये अ‌ॅड. असीम सरोदे हे खडसेंचे वकील आहेत.

 • 05 Jan 2021 11:43 AM (IST)

  एकत्र येऊन कामं केली तरच आपण राष्ट्रीय लक्ष्य गाठू शकू - मोदी

  एकत्र येऊन कामं केली तरच आपण राष्ट्रीय लक्ष्य गाठू शकू, असंही मोदी म्हणाले, ते आज कोची येथील कोची - मंगळुरु नैसर्गिक गॅस पाईपलाईनबाबत संबोधित करत होते

  Dedicating the Kochi - Mangaluru Natural Gas Pipeline to the nation. #UrjaAatmanirbharta https://t.co/u8x0hQGUcR

  — Narendra Modi (@narendramodi) January 5, 2021

 • 05 Jan 2021 11:40 AM (IST)

  मासेमारी करणारे हे समुद्रावर अवलंबूनच नाही आहेत त्याचे संरक्षकही आहेत - मोदी

  मासेमारी करणारे हे समुद्रावर अवलंबूनच नाही आहेत त्याचे संरक्षकही आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक निर्णय घेण्यात येत आहेत, त्यामुळे सामान्य मासेमारी करणाऱ्यांना मदत होत आहे, गेल्या वर्षी २० हजार कोटी रुपयांची मस्त्य योजनेची सुरुवात करण्यात आली आहे, याचा फायदा कोचीच्या मासेमाऱ्यांना होणार आहे

 • 05 Jan 2021 11:37 AM (IST)

  येत्या दहा वर्षांत पेट्रोलचा वापर 20 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे - पंतप्रधान मोदी

  देशाला भविष्यातील गरजांसाठी आजपासून तयार करण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे नैसर्गिक वायूवर लक्ष केंद्रित केलं जात आहे, देशात बायोफ्युअलवर काम केलं जात आहे, इथोनॉलच्या निर्माणावर काम केलं जात आहे, येत्या दहा वर्षांत पेट्रोलचा वापर 20 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे

 • 05 Jan 2021 11:20 AM (IST)

  राजीनामा दिलेला नाही, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार: बाळासाहेब थोरात

  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. यावेळी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचं थोरात म्हणाले.

 • 05 Jan 2021 11:07 AM (IST)

  जळगाव विद्या प्रसारकाच्या संचालकांना डांबून ठेवल्याचा आरोप, गिरीश महाजनांवर गुन्हा

  माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, जळगाव विद्या प्रसारकाच्या संचालकांना डांबून ठेवल्याचा आरोप, संचालकाला मारहाण करून खंडणी मगितल्याचा आरोप, कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल

 • 05 Jan 2021 11:04 AM (IST)

  कोल्हापुरात मुंबई महापालिकेसाठी शासकीय नोकरी देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा

  कोल्हापुरात मुंबई महापालिकेसाठी शासकीय नोकरी देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा, नवी मुंबई पोलिसांनी कोल्हापुरातील 5 जणांना केली अटक, अटक केलेले संशयित करवीर, पन्हाळा,कागल, राधानगरी तालुक्यातील, संशयितांनी नवी मुंबईतील पाच जणांकडून उकळले वीस लाख रुपये, संशयितांनी मुंबई महापालिकेतील नियुक्तीची बनवट पत्रिका जिल्ह्यातही तपासात झालं उघड

 • 05 Jan 2021 10:52 AM (IST)

  शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी? किरीट सोमय्यांचा खुलासा

  - शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांची होणार चौकशी... ??, - सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या चौकशीबाबत केंद्र सरकार, ईडी, रिझर्व्ह बँकेला कागदपत्र दिली होती. सिटी बँकेमध्येही घोटाळा झाला आहे. त्यांच्याबद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.

 • 05 Jan 2021 10:34 AM (IST)

  पुण्यात मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून 18 कोटी दंड वसूल

  पुण्यात मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून 18 कोटी दंड वसूल, सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही लाखो लोक बेशिस्तपणे वर्तवणूक करत असल्याचे निदर्शनास, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आतापर्यंत दोन लाख 71 हजार नागरिकांवर कारवाई, त्यांच्याकडून सुमारे 18 कोटी 64 लाख रूपयांचा दंड वसूल, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वाधिक नागरिक हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील, त्याखालोखाल पुणे शहरातील नागरिकांचा समावेश आहे.

 • 05 Jan 2021 10:16 AM (IST)

  मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांकडून अटक

  मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी केली अटक, सायकलच्या एवजी दूचाकी ने डब्बेवाले करणार जेवण डब्ब्याची डिलीवरी, म्हणून दूचाकी वाहन घेण्याच्या नावाखाली घेतले होते अनेक डब्बे वाल्यांकड़ून पैसे, डब्बेवाल्याना मोफत दुचाकी देण्याच्या प्रकरणात फसवणुकीचा दाखल होत गुन्हा, घाटकोपर पोलीस करत आहे पुढील तपास

 • 05 Jan 2021 09:32 AM (IST)

  गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा पूर्ण बंद

  गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार, तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा पूर्ण बंद राहणार, शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार, पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

 • 05 Jan 2021 09:30 AM (IST)

  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात तक्रार देणारी तरुणी गायब

  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात तक्रार देणारी तरुणी गायब, बलात्काराची तक्रार देणारी तरुणी आता सापडेना, तरुणी नॉटरिचेबल असल्‍याची सूत्रांकडून माहिती, तरुणीच्या शोधात लागली संपूर्ण यंत्रणा कामाला, तरी शोध लागेना, आरोपीला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत पोलिसांनी घरी येऊ नये, असा तरुणीचा पवित्रा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा गुन्ह्यात कुठलाही संबंध नसल्याचे पोलिसांनी दिले होते स्पष्टीकरण

 • 05 Jan 2021 09:24 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी कायम, नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

  औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी कायम, नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, 31 जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी कायम, यापूर्वी 5 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली होती संचारबंदी, रात्री 10:30 वाजताच दुकाने हॉटेल बंद आणि आस्थापना करण्याचा इशारा, रात्री 11:00 नंतर दुकाने हॉटेल आस्थापना खुल्या असल्यास होणार कारवाई, रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी कायम

 • 05 Jan 2021 09:03 AM (IST)

  डोंबिवली ग्रामीण भागातील जंगल आणि टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचा एल्गार

  डोंबिवली ग्रामीण भागातील जंगल आणि टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचा एल्गार, उंबार्ली ,धामटांन टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींच आंदोलन, म्हाडा प्रकल्प आणि होणाऱ्या अतिक्रमणाला पर्यावरण प्रेमींचा विरोध, हातात फलक घेऊन महिला, चिमुरड्यांसह पर्यावरण प्रेमींच डोंगरावर आंदोलन, म्हाडा प्रकल्प कामासाठी होत आहे डोंगर फोडण्याचे काम

 • 05 Jan 2021 08:54 AM (IST)

  नाशकात घरगुती वादातून बापाने आवळला मुलाचा गळा, संशयित पित्याला अटक

  नाशकात घरगुती वादातून बापाने आवळला मुलाचा गळा, संशयित पित्याला पोलिसांनी केली अटक, पित्याने दिड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याने मुलाने केला होता वडिलांना विरोध, नाशिक पूना रोड वरील वैद्यनगरमध्ये घडली घटना

 • 05 Jan 2021 08:30 AM (IST)

  नाशकात आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

  नाशकात आठवड्या भरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, एका आठवड्यात 190 जणांना नव्याने संसर्ग, तर 5 जणांचा आठवड्याभरात मृत्यू, सद्यस्थितीत जिल्ह्यात 1776 जणांवर उपचार सुरु, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी काळजी घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे नाशिककरांना आवाहन

 • 05 Jan 2021 08:25 AM (IST)

  ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका

  ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, ढगाळ वातावरणामुळे कापूस खरेदी केंद्र बंद, ढगाळ वातावरणामुळे कापसाचे वाढते वजन, वजन वाढत असल्यामुळे कापूस खरेदी बंद, कापसात मॉइश्चरचे प्रमाण वाढल्यामुळे सदोष वजन होत नसल्याचे कंपन्यांचा दावा, कापूस खरेदी बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

 • 05 Jan 2021 08:08 AM (IST)

  औरंगाबादच्या ग्रामीण भागात शाळांना अजूनही थंड प्रतिसाद, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची फक्त 34 टक्के उपस्थिती

  औरंगाबादच्या ग्रामीण भागात शाळांना अजूनही थंड प्रतिसाद, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची फक्त 34 टक्के उपस्थिती, कोरोनामुळे शाळेत संक्रमण होण्याचे प्रमाण शून्य टक्के, तरीही शाळेत जाण्याबाबत अनेकांमध्ये भीतीचे वातावरण

 • 05 Jan 2021 08:06 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण, अनेक ठिकाणी बरसला तुरळक स्वरुपाचा पाऊस

  औरंगाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण, अनेक ठिकाणी बरसला तुरळक स्वरुपाचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाला होतोय धोका, तूर हरभरा गहू ज्वारी करडी आशा पिकांना धोका, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल

 • 05 Jan 2021 07:30 AM (IST)

  नागपूर महापौर, उपमहापौर पदासाठी आज निवडणूक

  नागपूर महापौर, उपमहापौर पदासाठी आज निवडणूक, ऑनलाइन पद्धतीनं होणार निवडणूक,  भाजपकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी तर उपमहापौर पदासाठी मनीषा धावडे उमेदवार,  काँग्रेसची गटबाजी कायम, महापौर पदासाठी दोन तर उपमहापौर पदासाठी दोन उमेदवार, सकाळी 11 वाजता होणार ऑनलाइन पद्धतीनं निवड प्रक्रिया सुरु,  ॲानलाईन निवडणुकीला भाजप नेते धर्मपाल मेश्राम यांचा विरोध

 • 05 Jan 2021 06:42 AM (IST)

  कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा

  बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडसाठी लॉकडाऊनची घोषणा केली, ब्रिटनने कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण आढळून आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे

 • 05 Jan 2021 06:30 AM (IST)

  शहापूरमध्येही रात्री पाऊस, वातावरणात गारवा

  शहापूरमध्ये रात्री 2 वाजून 25 मिनिटाने अचानक पावसाच्या जोरदार सरी बरसल्या,4 ते 5 मिनिटे सतत पाऊस पडला त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे

 • 05 Jan 2021 06:28 AM (IST)

  लासलगावात पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता

  लासलगाव परिसरात अचानक मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी, पाच ते सात मिनिटे झालेल्या जोरदार पावसाने काढणीला आलेल्या द्राक्ष, कांदा, गहू, हरभरासह इत्यादी पिकांना फटका बसण्याची शक्यता, बळीराजाच्या चिंतेत वाढ

Published On - Jan 05,2021 10:50 PM

Follow us

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI