Corona Update | राज्यात बरे होणाऱ्यांचं प्रमाण 80 टक्क्यांवर, सहा दिवसात 93,426 रुग्णांनी कोरोनाला हरवलं

राज्यात गेल्या सहा दिवसात 88 हजार 678 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख 53 हजार 653 वर पोहोचली.

Corona Update | राज्यात बरे होणाऱ्यांचं प्रमाण 80 टक्क्यांवर, सहा दिवसात 93,426 रुग्णांनी कोरोनाला हरवलं

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 10 हजार 244 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे (Maharashtra Corona Virus Recovery Rate). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 लाख 53 हजार 653 वर पोहोचली आहे. तर, आज 12 हजार 982 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 11,62,585 कोरोना रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 52 हजार 277 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80 टक्क्यांवर पोहोचलं आहे (Maharashtra Corona Virus Recovery Rate).

तर, राज्यात गेल्या सहा दिवसात 88 हजार 678 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख 53 हजार 653 वर पोहोचली. तर, या सहा दिवसात तब्बल 93 हजार 426 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

– राज्यात 4 ऑक्टोबर रोजी 13 हजार 702 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 15 हजार 048 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.

– 3 ऑक्टोबर रोजी 14 हजार 348 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 16 हजार 835 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.

– तसेच 2 ऑक्टोबर रोजी 15 हजार 591 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 13 हजार 294 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.

– 1 ऑक्टोबर रोजी 16 हजार 476 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 16 हजार 104 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते (Maharashtra Corona Virus Recovery Rate).

– याशिवाय 30 सप्टेंबर रोजी 18 हजार 317 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 19 हजार 163 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.

गेल्या सहा दिवसात किती रुग्ण वाढले?

दिनांकवाढलेले रुग्ण
5 ऑक्टोबर12,982
4 ऑक्टोबर15,048
3 ऑक्टोबर16,835
2 ऑक्टोबर13,294
1 ऑक्टोबर 16,104
30 सप्टेंबर18,317

Maharashtra Corona Virus Recovery Rate

संबंधित बातम्या :

धक्कादायक | अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतही घरातच ठेवल्याने कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, पत्नीविरोधात गुन्हा

Eknath Shinde | एकनाथ शिंदे कोरोनामुक्त, खासदार मुलासोबत रुग्णालयातून घरी

Published On - 11:57 pm, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI