AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलयुक्त शिवारची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल, हा सरकारचा गैरसमज- फडणवीस

जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला, याचे प्रदर्शन मी लवकरच मांडेन | Devendra Fadnavis

जलयुक्त शिवारची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल, हा सरकारचा गैरसमज- फडणवीस
| Updated on: Oct 20, 2020 | 10:36 AM
Share

उस्मानाबाद: जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी जनतेचा आहे. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला, याचे प्रदर्शन मी लवकरच मांडेन, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis on SIT probe of Jalyukta Shivar scheme)

देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांच्या दौरा करत आहेत. सोमवारी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भागांची पाहणी केली होती. आज ते उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांकडून त्यांना जलयुक्त शिवारच्या एसआयटी चौकशीबाबत प्रश्न विचारला. यावर फडणवीस यांनी सरकारला जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करायची असेल तर करु दे, असे म्हटले. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत एकूण सहा लाख कामे झाली. यापैकी मोजक्या कामांबद्दलच तक्रारी आल्या. सरकारी योजनेतील तक्रारींचा टक्का पाहता हे प्रमाण खूपच कमी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुळात जलयुक्त शिवार योजनेची कंत्राटे ही मंत्रालयात सही करून दिलेली नाहीत. हे सर्व काम विकेंद्रित पद्धतीने झाले. स्थानिक पातळीवर जनसहभाग आणि विविध संस्था आणि खात्यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवारची कामे झाली. एक ते पाच लाख रुपयांची कंत्राटे मंजूर करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जलयुक्त शिवारमध्ये 9 हजार कोटी खर्च झाले. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. याशिवाय, ‘कॅग’च्या अहवालातही जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला होता.

संबंधित बातमी:

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

जलयुक्त शिवाराची ओपन चौकशी होईल; भाजपने घाबरून जाऊ नये; जयंत पाटलांचा खोचक टोला

Special Report | फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची SIT द्वारे चौकशीचे आदेश!

(Devendra Fadnavis on SIT probe of Jalyukta Shivar scheme)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.