AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज पहाटेच्या सुमारास (Viju Khote Death) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन
| Updated on: Sep 30, 2019 | 8:51 AM
Share

मुंबई : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज (30 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास (Viju Khote Death) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत (Viju Khote Death) मालवली. विजू खोटे यांच्या निधनामुळे सर्व सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

त्यांनी आपल्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. त्यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत (Viju Khote Death) आहे. सिनेसृष्टीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. विनोदाच्या अचूक वेळेसाठी त्यांना नेहमी ओळखले जायचे.

‘शोले’ चित्रपटातील कालियाच्या भूमिकेसाठी त्यांना विशेष ओळखलं जातं. “सरकार, मैंने आपका नमक खाया है” हा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यासोबतच ‘अंदाज अपना अपना’ या अमिनेता आमिर खान आणि सलमान खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमातली त्यांची रॉबर्ट ही भूमिका देखील विशेष गाजली. या चित्रपटातील ‘गलती से मिस्टेक हो गया’ हा संवाद अद्यापही लोकप्रिय आहे.

विजू खोटे यांचा जन्म 17 डिसेंबर 1941 मध्ये झाला. ‘या मालक’ या 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या 55 वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. छोट्या पडद्यावरील ‘जबान संभालके’ या मालिकेतही त्यांनी अतिशय उत्तम अभिनय केला होता. विशेष म्हणजे चित्रपटाप्रमाणे मराठी नाट्यसृष्टीही त्यांनी गाजवली.

‘अनोखी रात’, ‘जीने के राह’, ‘शरीफ बदमाश’, ‘इनसानियत’, ‘तपस्या’, ‘कर्ज’, ‘अंदर बाहर’ यासह अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात त्यांनी ‘बळी’ नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती.

सिनेसृष्टीत चार दशकाहून अधिक वावरतानाही ते प्रत्येक भूमिकांचा अभ्यास करतं. ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अदलाबदली’ यासारख्या मराठी चित्रपटात ते वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारु शकले. कोणतीही भूमिका करताना त्याची कथा आणि स्क्रिप्ट चांगलं असायला हवं असा त्यांचा आग्रह असायचा. कालिया, गँगस्टर, डाकू, डॉनचा उजवा-डावा हात, विमा एजंट यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. ‘भगतसिंग’ या चित्रपटात केवळ एका सीनसाठी काम करताना त्यांना कुठेही मानहानी झाल्याप्रमाणे वाटलं नाही.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.