मारुती सुझुकीकडून ‘Buy Now Pay Later’ ऑफर लाँच, आता कार घ्या, दोन महिन्यांनी EMI सुुरु

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Maruti Suzuki launch Buy Now-Pay Later offer) आहे.

मारुती सुझुकीकडून 'Buy Now Pay Later' ऑफर लाँच, आता कार घ्या, दोन महिन्यांनी EMI सुुरु

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Maruti Suzuki launch Buy Now-Pay Later offer) आहे. लॉकडाऊनमुळे देशातील नागरिकांसमोर आर्थिक सकंट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसाठी मारुती सुझुकी कंपनीने ‘Buy Now-Pay Later’ अशी ऑफर लाँच केली आहे. या ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना गाडी खरेदी केल्यानंतर सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या ईएमआयमध्ये सूट देत आहे. मारुती सुझुकी आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीच्या भागीदारीतून ही ऑफर सुरु (Maruti Suzuki launch Buy Now-Pay Later offer) केली आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कंपनीने ग्राहकांसाठी ‘Buy Now-Pay Later’ ही नवी ऑफर आणली आहे. ही ऑफर मारुतीच्या काही निवडक गाड्यांवर उपलब्ध आहे. ही ऑफर 30 जून 2020 च्या आधी जे गाडी घेतील त्या कर्जावर ही ऑफर लागू होणार. यापूर्वी टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांनीही अशा प्रकारची ऑफर लाँच केली होती.

“लॉकडाऊनमध्ये ज्या ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामाना करावा लागत आहे. अशा ग्राहकांना सवलत देण्यासाठी आम्ही ही ऑफर लाँच केली आहे. मला विश्वास आहे की ‘Buy Now-Pay Later’ ऑफर ग्राहकांच्या खिशाला परवडणारी असेल आणि गाडी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित ठरेल”, असं मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शंशाक श्रीवास्तव यांनी सांगितले.

“आर्थिक संकटात ग्राहकांना फायदा होण्यासाठी आम्ही भागीदारी केली आहे.  या ऑफरच्या माध्यमातून त्यांचे लक्ष केंद्रित केले जात आहे. आमची भागीदारी कार फायनान्समध्ये आम्हाला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाईल. आमच्या एकूण 1 हजार 94 शाखा शहरात आणि ग्रामीण भागात आहे”, असं चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेडचे कार्यकारी संचालक रविंद्र कुंडू यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

रेनॉच्या BS4 कारवर 2 लाखांचा डिस्काऊंट

‘टाटा मोटर्स’कडून चार कार लाँच होणार, पाहा किंमत

Hyundai Aura बुक करा केवळ 10 हजारात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI