संगमनेरमध्ये भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

संगमनेरमध्ये भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

जिल्ह्यातील संगमनेर शहरात बहीण-भावाच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणारी घटना समोर आलीय (Minor girl pregnant after Physical abuse by cousin brother in Sangamner).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 05, 2020 | 6:24 PM

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर शहरात बहीण-भावाच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणारी घटना समोर आलीय (Minor girl pregnant after Physical abuse by cousin brother in Sangamner). चुलत भावा लैंगिक अत्याचार केल्याच्या घृणास्पद कृत्यातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या दृष्कृत्याला जबाबदार असणार्‍या पीडित मुलीच्या सख्ख्या चुलत भावाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

संगमनेर शहरातील मध्यवस्तीत एका इमारतीमध्ये दोन भावांचे कुटुंब राहते. साधारण 3 महिन्यांपूर्वी यातील एका कुटुंबातील मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्या चुलत भावाने बहिणीशीच लगट करण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यांपूर्वी आरोपी भावाने इमारतीत पीडित मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर संबंधित प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

अत्याचारानंतर जीवे मारण्याची धमकी भेटल्याने पीडित मुलीने घाबरुन या अन्यायाची कोठेही वाच्यता केली नाही. याचा आरोपी भावाने वेळोवेळी फायदा घेतला आणि गेली 3 महिने तो तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करत राहीला. 4 दिवसांपूर्वी मुलीचे पोट दुखू लागल्याने लोणीच्या प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर पीडित मुलीचे पालक हादरले.

यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलीच्या पालकांनी याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी थेट लोणीच्या प्रवरा रुग्णालयात जावून त्या मुलीचा जबाब नोंदवला. आरोपी तरुणाविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 (2) (फ) (एन) 323, 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. .या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

UP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगरमध्ये तक्रारदार महिलेवरच बंदुकीचा धाक दाखवत बलात्काराचा आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक

Minor girl pregnant after Physical abuse by cousin brother in Sangamner

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें