AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रोल करताना सावधान! मोदी, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो खासगी कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये सर्रास वापरला जातो. त्यामुळे आता सरकारने प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो वापरण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

ट्रोल करताना सावधान! मोदी, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई
| Updated on: Nov 11, 2019 | 4:53 PM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अशा देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोटो जाहिरातीत वापरल्यास अथवा मिम्स, ट्रोल केल्यास आता मोठी कारवाई होऊ शकते.  केंद्र सरकारकडून प्रतिक कायद्यात काही बदल करण्यात आले आहेत. (Emblems and Names (Prevention of improper use) Act 1950) या बदलांनंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या फोटोंचा चुकीचा वापर केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. अशा प्रकारच्या पहिल्या चुकीवर 200 पट दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो खासगी कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये सर्रास वापरला जातो. त्यामुळे आता सरकारने प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो वापरण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याअंतर्गत 1950 च्या कायद्यानुसार, शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सात दशकांपूर्वीच्या जुन्या कायद्यात दुरुस्तीचा मसुदा तयार केला असून त्याबाबत जनमत जाणून घेण्यात आले. कायदा मंत्रालयाने या मसुद्याला सहमती दर्शविली आहे आणि जनमत घेतल्यानंतर हा मसुदा मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. सध्याच्या कायद्यात अशा प्रकारच्या चुकीवर 500 रुपये दंडाची तरतूद आहे. नव्या कायद्याअंतर्गत हा दंड 200 पटीने वाढवून एक लाख रुपये करण्यात आला आहे.

सरकारने जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरणाऱ्या देशातील दोन बड्या कंपन्यांना (रिलायन्स जिओ आणि पेटीएम) 2017 मध्ये नोटीस पाठवलं होतं. तसेच, या कंपन्यांवरदंडही ठोठावण्यात आला होता. यानंतर काद्यातही बदल करण्यात आला आहे. कारण जुना दंड कमी असल्याने कुणालाही त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तयार केलेल्या नव्या आराखड्यात पहिल्यांदा या नियमाचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड ठेवण्यात आला आहे. तर एक पेक्षा अधिकवेळा या नियमाचं उल्लंघन केल्यास पाच लाख रुपयाचा दंड आकारला जाईल. कारण, सात दशकांपूर्वीच्या कायद्यात असलेला दंड हा सध्य़ाच्या दृष्टीने अत्यंत कमी होता. त्याशिवाय, या नियमाचं वारंवार उल्लंघन केल्यास तीन ते सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.