रमेश कदम तुरुंगातून विधानसभा लढवणार

राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेले मोहोळचे आमदार रमेश कदम (MLA Ramesh Kadam is in prison) हे तब्बल सव्वा चार वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यामुळे मोहोळचा कारभार गेल्या सव्वा चार वर्षांपासून आमदाराविना सुरु आहे. मात्र, रमेश कदम यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते थेट तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत (Ramesh Kadam cast elections from prison). रमेश कदम हे 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते.

रमेश कदम तुरुंगातून विधानसभा लढवणार
Follow us
| Updated on: Sep 21, 2019 | 5:44 PM

सोलापूर : विधानसभेचा बिगुल (Maharashtra Vidhan Sabha Elections) अखेर आज वाजला. त्यानंतर अनेक मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी पुन्हा सत्तेवर आरुढ होण्यासाठी कंबर कसली. तर गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी यंदा तरी मतदार राजा आपल्याला स्वीकारेल का? याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. मात्र, मोहोळ मतदारसंघात काही वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे (No MLA in Mohol).

राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेले मोहोळचे आमदार रमेश कदम (MLA Ramesh Kadam is in prison) हे तब्बल सव्वा चार वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यामुळे मोहोळचा कारभार गेल्या सव्वा चार वर्षांपासून आमदाराविना सुरु आहे. मात्र, रमेश कदम यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते थेट तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत (Ramesh Kadam cast elections from prison). रमेश कदम हे 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, त्यांच्यांवर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

मोहोळच्या जनतेला वाली नाही

नटसम्राट या नाटकातील ‘कुणी घर देता का घर’ हे वाक्य खूप प्रसिद्ध झालं. अशीच काहीशी अवस्था सध्या मोहोळ तालुक्यातील लोकांची झाली आहे. त्यांच्याही मनात सध्या ‘कुणी आमदार देता का आमदार’ सुरु आहे. मोहोळ मतदारसंघाचे आमदार रमेश कदम हे आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे तालुक्याला ‘कुणी आमदार देता का आमदार’ म्हणण्याची वेळ आली आहे.

मोदी लाटेतही रमेश कदम यांचा विजय 

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही मोहोळ राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या काळात लादलेल्या रमेश कदम यांचा विजय झाला होता. तेथील पूर्वाश्रमीचे माजी आमदार राजन पाटील यांचा मतदारसंघावर असलेल्या मजबूत पकडीमुळे रमेश कदम यांचा विजय झाला होता. मात्र, डोक्यात विजयाची हवा शिरलेल्या आमदार रमेश कदम यांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता आपला एकहाती कारभार सुरु ठेवला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड न घालता विधायक राजकारण न करता थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणे, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, त्यामुळे रमेश कदम नेहमीच चर्चेत राहिले.

मोहोळ येथील रस्त्यांवर प्रशासनाने लावलेली जाळी काढल्याच्या कारणावरुन सरकारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अटक आंदोलनाचं नाट्यही त्यांनी केलं होतं. त्यावेळी आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली होती. त्यामुळे आमदार महोदयांना काही दिवस न्यायालयीन कोठडीतही राहावं लागलं होतं. त्यानंतर रमेश कदम, अण्णाभाऊ साठे हे महामंडळाच्या साडेचारशे कोटीच्या घोटाळयाप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे गेल्या सव्वा चार वर्षांपासून मोहोळच्या लोकांना आमदाराचा चेहराच पाहायला मिळालेला नाही. परिणामी तालुक्याचा विकास थांबला.

आमदार रमेश कदम यांच्या कार्यपद्धतीवर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते कमालीचे नाराज होते. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळयाप्रकरणी अटक झाल्यानंतर आमदार कदमांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तर सत्ता असूनही आमदार नसल्यामुळे विकासाची गाडी थांबल्याचा आरोप मतदारसंघातील नागरिकांनी केला. आमदार नसल्याने जनतेसोबतच सत्तेत असलेल्या स्थानिक भाजपा नेत्यांचीही मोठी अडचण झाली. त्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी पालकमंत्र्यापुढे हात पसरावे लागत आहेत.

रमेश कदम यांनी केलेल्या विकासकामांमुळे जनतेला दिलासा

आमदार रमेश कदम यांनी घोटाळ्यात अडकण्यापूर्वी सरकारी मंजुरी मिळण्याची वाट न पाहता अनेक विकास कामांचा धडाका लावला. मागेल त्याला पाणी, मागेल त्याला बोरवेल, मागेल त्याला टँकर अशा अनेक लोकोपयोगी कामांमुळे मोहोळ येथील लोकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. आता मात्र आमदाराचा पत्ता नसल्यामुळे अनेक शिक्षण, आरोग्य, संजय गांधी निराधार योजना, दक्षता कमिटीसारख्या अनेक कमिट्या अद्यापही स्थापन झालेल्या नाहीत. याबाबत मोहोळ तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांनी चक्क मुख्यमंत्र्याकडे साकडे घालत मोहोळ तालुका दत्तक घेण्याची मागणी केली. मात्र, त्यालाही अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

रमेश कदम तुरुंगातून विधानसभा लढवणार

रमेश कदम हे कारागृहात असले, तरी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी, सध्या रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम मतदारसंघातील लोकांशी संपर्क वाढवत आहेत. मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. या आढाव्याच्या माध्यमातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघ पिंजून काढलं जात आहे.

लोकशाहीत लोक प्रतिनिधी आणि सरकार या दोघांची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्यामुळेच लोकशाहीचा गाडा सुरळीत चालतो. मात्र, गेली सव्वा चार वर्ष इथल्या नागरिकांना आमदाराविना काढावी लागली. आता पुन्हा विधानसभेचं बिगुल वाजलं आहे, आता तरी आम्हला आमदार मिळेल का? असा सवाल इथले मतदार करत आहेत.

संबंधित बातम्या :

टीव्ही 9 मराठीचा सर्वात मोठा पोल, महाराष्ट्रात लाट कुणाची?

राज्य निवडणूक आयोगाचा जोश हाय, यंत्रणा सज्ज, निवडणुकीसाठी 850 कोटीचा खर्च अपेक्षित

विधानसभा निवडणूक 2019 | 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजणी

तुरुंगात असलेल्या रमेश कदमांना लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी पाहिजे

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.