भाजप सरकारच्या काळात दुप्पट शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरटीआयमधून खुलासा

2013 ते 2018 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 15 हजार 356 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आकडेवारीवरुन आघाडी सरकारपेक्षा भाजपच्या काळात दुप्पट शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide In Maharashtra) केल्याचे स्पष्ट होत आहे. 

भाजप सरकारच्या काळात दुप्पट शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरटीआयमधून खुलासा

मुंबई : भारतातील 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. रात्रंदिवस कष्ट करुन शेतकरी देशाचे पोट भरुन जिवंत ठेवतात. मात्र हेच शेतकरी स्वत:ला जिवंत ठेवू शकत नाही. नुकतंच झालेल्या माहिती अधिकार कायद्यानुसार, 2013 ते 2018 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 15 हजार 356 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आकडेवारीवरुन आघाडी सरकारपेक्षा भाजपच्या काळात दुप्पट शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide In Maharashtra) केल्याचे स्पष्ट होत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी शेतकरी व वनविभागाकडून आत्महत्येबद्दल माहिती मागवली होती. यानुसार, 2013 ते 2018 या कालावधीत महाराष्ट्रात एकूण 15 हजार 356 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने केवळ 8 हजार 911 शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास पात्र ठरवले आहे. तर 5 हजार 713 आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. तसेच एकूण 732 आत्महत्यांचा तपास सुरू आहे.

दरम्यान यातील एकूण 8 हजार 868 मृत शेतकऱ्याच्या कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. आघाडी सरकारच्या तुलनेत भाजप सरकारच्या काळात दुप्पट शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide In Maharashtra) केली आहे.

एकूण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती

2013 मध्ये एकूण 1 हजार 296 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मात्र 655 शेतकर्‍यांची आत्महत्या पात्र ठरवले आहे. तर 629 शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरवल्या गेल्या असून 2 आत्महत्यांचा तपास सुरू आहे. तसेच एकूण 665 मृत शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे.

2014 वर्षांमध्ये एकूण 2 हजार 039 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. केवळ 1 हजार 385 शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या. तर 675 शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरवल्या असून 7 आत्महत्यांचा तपास सुरू आहे. तसेच एकूण 674 मृत शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. या काळातच शेतकरी आत्महत्या जवळपास 60 टक्क्यांनी वाढली.

2015 मध्ये राज्यात एकूण 3 हजार 263 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. यातील केवळ 2152 शेतकरी आत्महत्या पात्र आहेत. तर 1081 शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि आजही 30 आत्महत्यांचा तपास सुरू आहे. दरम्यान एकूण 2150 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत देण्यात आली आहे.

2016 मध्ये एकूण 3 हजार 080 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. यातील केवळ 1 हजार 768 शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या. तर 1 हजार 292 शेतकर्‍यांच्या आत्महत्येस अपात्र ठरवण्यात आले आणि आजही 20 आत्महत्यांचा तपास सुरू आहे. एकूण 1 हजार 768 मृत शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. यात आत्महत्या जवळपास 135 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

2017 मध्ये एकूण 2917 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. केवळ 1638 शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या. तर 987 शेतकर्‍यांच्या आत्महत्येस अपात्र ठरवण्यात आले आणि आजही 292 आत्महत्यांचा तपास सुरू आहे. एकूण 1611 मृत शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे.

गेल्यावर्षी 2018 मध्ये एकूण 2761 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. केवळ 1330 शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या. 1050 शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरवण्यात आले. अद्याप 381 आत्महत्यांचा तपास सुरू आहे. एकूण 1316 मृत शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे.

आत्महत्या केलेल्या पात्र शेतकर्‍याच्या कुटुंबियांना शासकीय सहाय्य म्हणून एक लाख रुपयेची मदत केली आहे. यात 30 हजार रुपये रोख दिले जातात. तर 70 हजार रुपये पोस्ट किंवा बँकेत मासिक जमा केले जातात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI