पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे

गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असलेल्या पालघर जिल्हा आज पुन्हा भूकंपाच्या (Palghar Earthquake) धक्क्याने हादरला

Namrata Patil

|

Oct 26, 2019 | 8:22 AM

पालघर : गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असलेल्या पालघर जिल्हा आज पुन्हा भूकंपाच्या (Palghar Earthquake) धक्क्याने हादरला. पालघरमधील डहाणू, कासा, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्क्याने पुन्हा हादरले. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे पालघरमध्ये काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचे धक्के बसले. यामुळे स्थानिक लोकांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले (Palghar Earthquake) आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, कासा, तलासरी तालुक्यात भूकंपाचे सातत्याने धक्के बसत असतात. शुक्रवारी (25 ऑक्टोबर) दिवसा आणि रात्री पालघरमध्ये जवळपास 5 सौम्य स्वरुपाचे धक्के (Palghar Earthquake) जाणवले. तर शनिवारी (26 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारात 2 धक्के बसल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरने केली आहे.

शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी कासा ,चारोटी, पेठ,शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का सौम्य स्वरुपाचा असला तरी नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शुक्रवारी 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल क्षमतेचे 5 धक्के पालघरमध्ये बसल्याची नोंद करण्यात आली (Palghar Earthquake) आहे.

दीड वर्षांपासून पालघरमध्ये सतत भूकंपाचे धक्के का जाणवत आहे, याची कारण शोधण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. भूकंपाने तडे गेलेली घरे, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्तावही पालघर जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडले आहेत. त्यामुळेही लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें