AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दगड उडून गाडीच्या छतातून आरपार, बँक मॅनेजरचा जागीच मृत्यू

महामार्गावरुन गाडी चालवणाऱ्या एका बँक मॅनेजरचा एका विचित्र अपघातात मृत्यू झाला. मध्‍य प्रदेशच्या बैतूल शहरात ही धक्कादायक घटना घडली.

दगड उडून गाडीच्या छतातून आरपार, बँक मॅनेजरचा जागीच मृत्यू
| Updated on: Oct 15, 2019 | 12:02 PM
Share

भोपाळ : जेव्हा कुणाचा काळ येतो, तेव्हा त्याच्या मृत्यूला कुठलंही शुल्लक कारण निमित्त ठरु शकतं. मृत्यू हा कुणालाही कधीही येऊ शकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी घटना मध्य प्रदेश राज्यात घडली (Baitul Car Accident). जिथे महामार्गावरुन गाडी चालवणाऱ्या एका बँक मॅनेजरचा एका विचित्र अपघातात मृत्यू झाला. मध्‍य प्रदेशच्या बैतूल शहरात ही धक्कादायक घटना घडली. एका खाणीत झालेल्या स्फोटामुळे उडालेला दगड महामार्गावरुन जाणाऱ्या गाडीवर पडला (Bank Manager Accident). तो दगड गाडीचं छप्पर फाडून आत शिरला आणि कार चालक बँक मॅनेजरच्या डोक्याला बसला. यामध्ये त्या बँक मॅनेजरचा मृत्यू झाला (Bank Manager Accident).

ही दुर्घटना सोमवारी (14 ऑक्टोबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास बैतूल-नागपूर फोरलेन रोडवर झाला (Baitul Car Accident). या अपघातात अशोक पवार यांचा मृत्यू झाला. ते इंडसइंड बँकेत मॅनेजर होते. अशोक पवार हे मुल्‍ताईच्या दिशेने जात होते. यादरम्यान अल्‍वी स्‍टोन क्रशर माईनमध्ये झालेल्या स्फोटातून एक दगड उडाला आणि अशोक पवार यांच्या गाडीचं छप्पर फाडून आत बसलेल्या पवार यांच्या डोक्याला जाऊन लागला, अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक आरएस मिश्रा मिश्रा यांनी दिली.

गाडीत आणखी दोघंही होते

या दगडाचा वेग इतका जास्त होता की तो सरळ गाडीचं छप्पर फाडून आत घुसला. हा दगड पवार यांच्या डोक्याला इतक्या जोरात बसला की यात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जबर मार बसला. अशोक पवार हे होशंगाबाद येथे राहायचे. सहायक पोलिस अधीक्षक आरएस मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत आणखी दोघं होते. ते दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीतील जितेंद्र यांनी अशोक पवार यांना दगड लागताच तात्काळ स्‍टिअरिंग सांभाळली आणि गाडी थांबवली.

या प्रकरणी बैतूलचे जिल्हाधिकारी तेजस्‍वी नायक यांनी एसडीएम लेव्हलवर चौकशीचे आदेश दिले आहेत. दिवसा खाणीत स्फोट का करण्यात आला याबाबत चौकशी केली जाईल. तसेच, सध्या स्‍टोन क्रशरलाही सील करण्यात आलं आहे.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.