भारताची रणनीती यशस्वी, पाकिस्तानकडून मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई

आंतरराष्ट्रीय दबाव आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) कारवाईच्या भीतीने पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास भाग पाडलं आहे.

भारताची रणनीती यशस्वी, पाकिस्तानकडून मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय दबाव आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) कारवाईच्या भीतीने पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास भाग पाडलं आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) गुरुवारी (3 डिसेंबर) मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या नातेवाईकांविरोधात निकाल देत शिक्षा सुनावली. हाफिज सईदची जमात-उद-दावा (JuD) संघटनेचा प्रवक्ता याहा मुजाहिदला दहशतवादी फंडिंग प्रकरणात 15 वर्षांची शिक्षा झाली आहे. मागील महिन्यातच त्याला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 32 वर्षांची संयुक्त शिक्षा सुनावण्यात आली होती (Mumbai terror attack mastermind Hafiz Saeed led jud spokesperson sent jail for 15 years).

मुजाहिदशिवाय लाहोरच्या न्यायालयाने जमात-उद-दावाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक जफर इकबालला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय हाफिज सईदचा मेहुणा असलेल्या प्राध्यापक हाफिज अब्दुल रहमान मक्कीला 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी न्यायालयाने इकबालला या प्रकरणात 26 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. ATC न्यायमूर्ती इजाज अहमद बुत्तर यांनी हा निर्णय दिला आहे.

न्यायालयाने या दोषींना शिक्षा सुनावली तेव्हा तिघेही न्यायालयात हजर होते. पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने (CTD) हाफिज सईद आणि अन्य लोकांवर विविध ठिकाणी 41 गुन्हे दाखल केले होते. आतापर्यंत न्यायालयाने 41 पैकी 25 प्रकरणांवर आपला निर्णय सुनावला आहे. पाकिस्तानच्या न्यायालयाने हाफिज सईदला वेगवेगळ्या 4 दहशतवादी फंडिंग प्रकरणात 21 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आणि त्याची संघटना आहे. या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह एकूण 166 नागरिकांचा जीव गेला होता.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

Jammu and Kashmir | पुलवाम्यात दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेड हल्ला, 12 नागरिक जखमी

ओसामा बिन लादेनला कसा ठोकला? बराक ओबामांकडून पाकिस्तानची पोलखोल

Mumbai terror attack mastermind Hafiz Saeed led jud spokesperson sent jail for 15 years

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI