नरेश-महेश जोडीचा अखेरचा प्रवासही पाठोपाठ, भावाच्या निधनानंतर अभिनेते नरेश कानोडियांचा अखेरचा श्वास

गुजराती चित्रपटांचे सुपरस्टार नरेश कानोडिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. नरेश कानोडिया 77 वर्षांचे होते. ते अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टिट्यूट रूग्णालयात उपचार घेत होते. उपचारा दरम्यान त्यांचा प्राणज्योत मालवली.

नरेश-महेश जोडीचा अखेरचा प्रवासही पाठोपाठ, भावाच्या निधनानंतर अभिनेते नरेश कानोडियांचा अखेरचा श्वास

अहमदाबाद : गुजराती चित्रपटांचे सुपरस्टार नरेश कानोडिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. नरेश कानोडिया 77 वर्षांचे होते. ते अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टिट्यूट रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी 200 हून अधिक गुजराती चित्रपटांत काम केले आहे. नरेश कानोडिया गुजराती चित्रपटांचे सुपरस्टार होते. आजही त्यांचे अनेक चाहते आहेत. नरेश कानोडिया यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शोक व्यक्त केला. ( Naresh Kanodia and Mahesh Kanodia death)

प्रसिद्ध गुजराती गीतकार महेश कानोडिया हे नरेश कानोडिया यांचे मोठे भाऊ होते. गुजराती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नरेश आणि महेश यांची जोडी प्रसिद्ध होती. महेश कानोडिया यांनी दोनच दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. महेश कानोडिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला होता. त्यानंतर नरेश कानोडिया यांनीही अखेरचा श्वास घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले होते की, महेश कानोडियाजी यांच्या निधनाचे अत्यंत दुःख झाले आहे. ते एक बहुआयामी प्रतिभावंत गायक होते. त्यांच्यावर जनतेनं भरभरून प्रेम केलं. एक राजकारणी म्हणूनही ते गरीब व मागासांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित राहिले. मी हितू कानोडिया यांना संपर्क करून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.

 

नरेश कनोडिया यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी पाटण येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यांचे भाऊ महेश कानोडिया हे पाच वेळा भाजपचे खासदार राहिले आहेत.

संबंधित बातम्या : 

Janhvi Kapoor | श्रीदेवींच्या आठवणीत हळवी, जान्हवी कपूरकडून आई-वडिलांचा खास फोटो शेअर

Sushant Singh Rajput | केदारनाथ फेम दिग्दर्शकाचा नवा सिनेमा, सुशांतऐवजी ‘या’ अभिनेत्याची वर्णी

( Naresh Kanodia and Mahesh Kanodia death)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI