नाशिक शहरात पहिला कोरोनाबळी, गरोदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका 20 वर्षीय गरोदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Nashik Corona Virus Pregnant Women Died) आहे.

नाशिक शहरात पहिला कोरोनाबळी, गरोदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 1:02 PM

नाशिक : राज्यातील कोरोनाबाधितांप्रमाणे कोरोनाबळींचीही संख्या वाढत चालली (Nashik Corona Virus Pregnant Women Died) आहे. नाशिक शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका 20 वर्षीय गरोदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 13 झाली आहे.

नाशिकच्या जिल्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी एक 20 वर्षीय नऊ महिन्यांची  गर्भवती (Nashik Corona Virus Pregnant Women Died) महिला रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर ताबडतोब उपचार सुरु करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

या महिलेला हृदय विकाराचा त्रास असल्याची माहिती समोर येत आहे. मृत्यूनंतर या महिलेचा कोरोनाचा अहवाल आला नव्हता. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट करण्यात आले नव्हते.

आज (5 मे) या गरोदर महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती नाशिकच्या जिल्हा विभागाने दिली. नाशिक शहरात कोरोना तपासणीची लॅब असतानाही तीन दिवसांनी जिल्हा रुग्णालयास अहवाल प्राप्त झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 13 वर पोहोचली आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात आज 4 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहर, सिन्नर, येवला, सटाणा या परिसरात प्रत्येकी एका नागरिकाचा यात समावेश आहे. नाशिकमधील बजरंगवाडी परिसरात रुग्ण आढळल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 52 वर गेली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 386वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच

महाराष्ट्रात काल (4 मे) दिवसभरात एकूण 771 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर गेली आहे. दिवसभरात 350 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानुसार आजपर्यंत राज्यातील एकूण 2 हजार 465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

या सर्वांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्यात सध्या 1 लाख 98 हजार 42 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 13 हजार 6 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या : 

भारतात 24 तासातील सर्वाधिक रुग्णसंख्या, 3900 नवे कोरोनाग्रस्त, 195 कोरोनाबळी

भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.