नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचं गूढ तीन दिवसात उकललं

बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे यांची गुरुवार 4 जून रोजी डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. (Navi Mumbai Builder Murder Mystery Solved)

नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचं गूढ तीन दिवसात उकललं

नवी मुंबई : नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी दोघा जणांना ताब्यात घेतलं आहे. बांधकामाची साईट मिळवण्यावरुन झालेल्या वादातून तिघांनी बिल्डरची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर अवघ्या तीन दिवसात पोलिसांना गूढ उकलण्यात यश आलं. (Navi Mumbai Builder Murder Mystery Solved)

बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे यांची गुरुवार 4 जून रोजी डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तायडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. नवी मुंबईमधील तळवली परिसरात दुपारी भरस्त्यात ही धक्कादायक घटना घडली होती.

ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी तळवली गावात राहणारे असून एक जण पसार झाला आहे. रबाले पोलिसांनी या अगोदर आरोपींची गाडी ताब्यात घेतली होती. घणसोली सेक्टर 21 (तळवली) येथे बांधकाम भूखंड विकसित करण्याचे काम मिळवण्यावरुन काही दिवसांपूर्वी यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

प्रवीण तायडे गुरुवार 4 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका साथीदारासोबत बाईकने जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या बाईकला जोराची धडक दिली. त्यानंतर आरोपींपैकी एकाने तायडेंवर गोळ्या झाडल्या.

(Navi Mumbai Builder Murder Mystery Solved)

गोळी तायडेंच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या साथीदारालाही गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. जखमी साथीदारावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. भरदिवसा घडलेल्या या थराराने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या :

नागपुरात कुख्यात गुंड बाल्या वंजारीचा खून, जिल्ह्यात 11 दिवसात 11 खून

नागपुरात तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीची हत्या, तीन संशयित ताब्यात

गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

कोल्हापुरात 55 वर्षीय महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, खलबत्ता डोक्यात घालून जीव घेतला

(Navi Mumbai Builder Murder Mystery Solved)

Published On - 8:37 am, Mon, 8 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI