नवाज शरीफ यांची प्रकृती चिंताजनक, तुरुंगात विष दिलं?

नवाज शरीफ (Nawaz Sharif poisoned) हे भ्रष्टाचार प्रकरणी लाहोरमधील कोट लखपत जेलमध्ये आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.

नवाज शरीफ यांची प्रकृती चिंताजनक, तुरुंगात विष दिलं?
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:28 AM

लाहोर : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सात वर्षांचा तुरुंगवास भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif poisoned) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना तुरुंगात पाकिस्तान सैन्याकडून विष दिलं असल्याचा आरोप त्यांचे चिरंजीव हुस्सैन नवाज यांनी केलाय. नवाज शरीफ (Nawaz Sharif poisoned) हे भ्रष्टाचार प्रकरणी लाहोरमधील कोट लखपत जेलमध्ये आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, नवाज शरीफ यांच्या पेशी कमी झाल्याचं सांगितलं जातंय. पण त्यांना विष देऊन पेशी कमी झाल्याचं सांगितलं जात असल्याचा आरोप मुलाने केलाय. नवाज शरीफ यांचे चिरंजीव लंडनमध्ये राहतात. माझ्या वडिलांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण हे सर्वांना माहित आहे, असंही हुस्सैन यांनी म्हटलंय.

पीएमएलएन अध्यक्ष आणि नवाज यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांनीही मंगळवारी त्यांची भेट घेतली. नवाज यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीविषयी चिंता वाटत आहे. त्यात सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करु, असं शाहबाज म्हणाले.

मंगळवारी समोर आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, नवाज शरीफ यांच्या शरीरातील पेशी 16 हजारांहून 2000 वर आल्या होत्या. ही अत्यंत नाजूक परिस्थिती मानली जाते. नवाज शरीफ सध्या डॉक्टरांच्या निगराणीत असले तरी त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर पाकिस्तान सैन्यावरही संताप व्यक्त केला जातोय.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.