AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : दुपारी आजारी असणारे नितेश राणे मोदींच्या सभेत पहिल्या रांगेत, फडणवीसांनी का थोपटली पाठ?

दुपारी आजारी असणारे नितेश राणे संध्याकाळी मात्र गोव्यात मोदींच्या सभेत (Pm Modi Speech) दिसले. गोव्यात मोदींच्या सभेत राणे पहिल्या रांगेत बसले होते. मोदी ज्यावेळी स्टेजवर आले, त्यावेळी मोबाईलचा टॉर्च चालू करून त्यांनी मोदींचं स्वागतही केलं. त्यामुळे दुपारी आजारी असणारे राणे संध्याकाठी ठणठणीत कसे झाले? अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

Nitesh Rane : दुपारी आजारी असणारे नितेश राणे मोदींच्या सभेत पहिल्या रांगेत, फडणवीसांनी का थोपटली पाठ?
नितेश राणे गोव्यातल्या सभेत
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 10:05 PM
Share

गोवा : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात गेल्या काही दिवासांपासून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अटकेत होते. काल त्यांना कोर्टाने जामीन मंजूर करत दिलासा दिला. पण त्यावेळी राणेंची तब्येत बरी नसल्याने राणेंना (Nitesh Rane Health) कोल्हापुरातल्या रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आज दुपारी राणे बाहेर आले. त्यानंतर माध्यमांना त्यांनी तब्येत अजूनही बरी नसल्याचे सांगितले. मात्र दुपारी आजारी असणारे नितेश राणे संध्याकाळी मात्र गोव्यात मोदींच्या सभेत (Pm Modi Speech) दिसले. गोव्यात मोदींच्या सभेत राणे पहिल्या रांगेत बसले होते. मोदी ज्यावेळी स्टेजवर आले, त्यावेळी मोबाईलचा टॉर्च चालू करून त्यांनी मोदींचं स्वागतही केलं. त्यामुळे दुपारी आजारी असणारे राणे संध्याकाठी ठणठणीत कसे झाले? अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी बऱ्याच दिवसांनी बाहेर आलेल्या नितेश राणेंची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठही थोपटली. त्यामुळे सभा जरी मोदींची असली तरी सगळ्यांच्या नजरा राणेंवरच होत्या.

दुपारी राणे काय म्हणाले?

दुपारी मध्यमांशी बोलताना मला अजूनही मनका, पाठीचा त्रास, शुगर लो होतेय, त्याचा इलाज करणार, पण जे बोलले हा राजकीय आजार आहे, पण आरोग्य व्यवस्थेने ज्या ज्या टेस्ट केल्या, त्या काही खोट्या होत्या का? आताच माझं बीपी चेक केलं, ते 152 आहे, ते काय खोटं असेल काय? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का? असे अनेक सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केले. त्यांनी बाहेर येताच थेट मुख्यमंत्र्यांनाही थेट टार्गेट केलंय. प्रश्न आम्हीही विचारु शकतो, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच महाविकास आघाडीतील नेत्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं, किती योग्य आहे? याचा तपासणं गरजेचं आहे. राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. असा हल्लाबोल राणेंनी यावेली केला आहे.

आधी आराम, उपचार करणार-राणे

दुपारी माध्यमांसमोर आल्यानंतर राणेंनी मुंबईला जाऊन उपचार घेणार आहे. आधी बरा होणार आहे. आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोव्याची जबाबदारी आहे, तिथेही गेलो नाही, तिथेही जाणार आहे. तब्येत सांभाळून मी कामला लागणार आहे. अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे. त्यामुळे आता अनेक राजकीय मंडळी सवाल उपस्थित करत आहेत. तसेच फडणवीसांनी राणेंची गोव्यात पाठ थोपटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोव्यात सध्या पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप पूर्ण जोर लावत आहे. फडणवीसांसह महाराष्ट्रातील नेत्यांची फळी त्यांनी गोव्यात उभी केली आहे. तसेच अमित शाह, मोदी यांनीही गोव्याात प्रचार केला आहे. नितेश राणे हेही गोवा आणि मुंबईची जबाबदारी ज्या नेत्यांना दिली आहे त्यात आहेत. असे राणेंकडूनच दुपारी सांगण्यात आले आहे.

Nitesh Rane Video: आधी तुरुंगाची हवा, नंतर आजारपण; जामीन मिळाल्यावर बाहेर येताच काय म्हणाले नितेश राणे?

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला थेट इशारा

बाळासाहेबांवर कारवाई करणााऱ्यांबरोबर सरकारमध्ये, बाघोबा म्हणून घेणारे चौकशीला का घाबरता? मुनगंटीवारांचा खोचक सवाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.