Bhandara Fire | ना आगरोधक यंत्रणा, ना स्मोक अलार्म, RTI च्या माहितीने प्रशासन उघडं

prajwal dhage

|

Updated on: Jan 09, 2021 | 12:11 PM

जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता धक्कादायक महिती समोर आली आहे. या रुग्णालयात 2018 पासून फायर सेफ्टीची कोणतीही सुविधा नसल्याचं उघड झालं आहे. (Dhandara district hospital fire)

Bhandara Fire | ना आगरोधक यंत्रणा, ना स्मोक अलार्म, RTI च्या माहितीने प्रशासन उघडं
लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं.
Follow us

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता धक्कादायक महिती समोर आली आहे. या रुग्णालयात 2018 पासून फायर सेफ्टीची कोणतीही सुविधा नसल्याचं उघड झालं आहे. महिती अधिकारखाली या रुग्णालयातील फायर सेफ्टीच्या सुविधाबाबत माहिती विचारण्यात आली होती. त्यांनतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान रुग्णालयातील हा भोंगळ कारभार समोर आल्यामुळे येथील रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (no fire safety instruments in Dhandara district hospital, where 10 child has been dead in fire)

फायर हायड्रन्टस, स्मोक अलार्म, सगळं काही राम भरोसे

या दुर्घटनेनंतर रुग्णालयाची परिस्थिती अतिशय वाईट असल्याचे समोर आले आहे. अचानक आग लागल्यास ती विझवण्यासाठी रुग्णालयात कोणतेही उपकरण नसल्याचे समजते आहे. भंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याने 2018 मध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयातील आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या माहितीने यंत्रणेचा कारभार उघडा पडला आहे.

अचानक आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी फायर हायड्रन्टस, स्मोक अलार्म, फायर स्प्रिंकलर्स आदी आवश्यक यंत्रणा या रुग्णालयात नाही. तसेच, आग विझवण्यासाठी लागणाऱ्या Fire Extinguisher ची अवस्था कधी भरलेले तर कधी रिकामे अशी आहे. रुग्णालयात अचानक आग लागली तर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी कोणताही आपत्कालीन मार्ग या रुग्णालयात नसल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे.

दरम्यान, कोणताही दवाखाना उभारताना नैसर्गिक आणि मानवनिर्मीत संकटांची शक्यता लक्षात घेऊनच त्याची रचना केली जाते. मात्र या रुग्णालयात अपत्कालीन स्थितीमध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. तसेच स्मोक अलार्म नसल्यामुळे बालकांच्या कक्षात धूर जमा झाल्यानंतर समजले नसावे अशी संकाही वरील महिती समोर आल्यानंतर उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात फायर सेफ्टीच्या यंत्रणा लावण्यासाठी लागणाऱ्या आराखड्याची आणि अंदाजपत्राची सर्व माहिती तसेच लागणाऱ्या निधीची माहिती वरिष्ठांना सांगितली असल्याचे प्रशासनाने माहिती अधिकाराच्या उत्तरामध्ये सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चौकशीचे आदेश

“भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Bhandara Hospital Fire | भंडाऱ्यात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं! सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश

Bhandara Hospital Fire | भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

भंडाऱ्याच्या हलगर्जीपणाच्या चौकशीची फडणवीसांची मागणी, पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक

(no fire safety instruments in Dhandara district hospital, where 10 child has been dead in fire)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI