वर्ध्यात सोनसाखळी चोरांचा हैदोस, अंगणात झाडू मारणाऱ्या आजींची सोनसाखळी लांबवली

अंगणात झाडू मारणाऱ्या एका आजींच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघ़डकीस आला आहे.(Chain Snatching In Wardha)

वर्ध्यात सोनसाखळी चोरांचा हैदोस, अंगणात झाडू मारणाऱ्या आजींची सोनसाखळी लांबवली

वर्धा : अंगणात झाडू मारणाऱ्या एका आजींच्या गळ्यातील 40 ग्रॅम सोन्याची साखळी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघ़डकीस आला आहे. वर्ध्यातील यशवंत नगर येथे सकाळी ही घटना घडली. हा सर्व थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Chain Snatching In Wardha)

वर्ध्यातील यशवंत नगर येथे सकाळी एक महिला अंगणात झाडू मारत होती. त्यावेळी एक युवक श्वानासोबत त्या ठिकाणी येऊन उभा राहिला. त्याने काही वेळ त्या श्वानासोबत घालवला. काही वेळाने ती महिला घरी जात असताना त्याने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केली.

मंगळवारी (6 ऑक्टोबर) हा सर्व प्रकार घडला. ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वीही वर्ध्यात अनेक सोनसाखळी पळवून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र अद्याप या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. (Chain Snatching In Wardha)

संबंधित बातम्या : 

संगमनेरमध्ये भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

लिफ्टच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीला किस, आरोपी 5 महिन्यांनी कल्याणमध्ये जेरबंद

Published On - 11:40 am, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI