AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’चा ट्रेलर

अर्जुन कपूर, क्रिती सॅनन आणि संजय दत्त यांचे फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.

VIDEO | आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत'चा ट्रेलर
| Updated on: Nov 05, 2019 | 12:45 PM
Share

मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित भव्यदिव्य ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Panipat Movie trailer) करण्यात आला आहे. सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सॅनन तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त पाहायला मिळणार आहे. अजय- अतुल यांचं संगीत असलेला हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

अर्जुन कपूर, क्रिती सॅनन आणि संजय दत्त यांचे फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. ‘पानिपत’ या ऐतिहासिक महानाट्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे आतुर आहेत.

प्रियांका चोप्राला ‘बाजीराव मस्तानी’मध्ये मराठमोळ्या काशिबाईंच्या भूमिकेत पाहिल्यानंतर क्रिती सॅनन पार्वतीबाईंची भूमिका कशी पेलते, याची उत्सुकता आहे. लगान, स्वदेस, जोधा अकबर सारखे तगड चित्रपट देणाऱ्या गोवारीकरांकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

‘कोई आपके घरपर हमला बोलेगा, तो आप शत्रूओंकी संख्या गिनोगे? या फिर पुरी ताकद के साथ उनका सामना करोगे?’ अशा एकापेक्षा एक डायलॉग्जचा भरणा ट्रेलरमध्ये आहे.

‘जस्सी’फेम अभिनेत्री मोना सिंह 38 व्या वर्षी बोहल्यावर

सदाशिवरावभाऊंची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी अर्जुन कपूरने वजन कमी केलं आहे. अर्जुनने इन्स्टाग्राम अकाऊण्टवर चित्रपटासाठी केलेल्या तयारीचे व्हिडीओही पोस्ट केले होते. याशिवाय मोहनीश बहल, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे यासारख्या बॉलिवूडचा पडदा गाजवणारे दिग्गज कलाकारही पुनरागमन करताना दिसत आहेत. सुहासिनी मुळगावकर, शैलेश दातार अशा मराठमोळ्या कलाकारांचं दर्शनही चित्रपटात (Panipat Movie trailer) घडणार आहे.

‘पानिपत’ हा चित्रपट पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालं होतं. 1761 मध्ये हरियाणातील पानिपतच्या मैदानावर झालेल्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.