पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जिल्ह्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याला पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराचा झटका येऊन (Farmer died) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यातील 4 गावांना कर्जमाफी मिळत नसल्याने काही शेतकरी उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याला पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराचा झटका येऊन (Farmer died) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भीमराव चव्हाण असे या शेतकऱ्याचे (Bhimrao chavan) नाव आहे. भीमराव चव्हाण हे पाथरी तालुक्यातील देवेगाव या ठिकाणचे रहिवाशी (Bhimrao chavan died heart attack) होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भीमराव गेल्या काही दिवसांपासून पाथरीच्या SBI बँकेत पीक कर्जासाठी चकरा मारत होते. मात्र त्यांना पीक कर्ज न मिळाल्याने ते तणावाखाली होते. यामुळे आज अचानक त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका (Farmer died due to heart attack) आला. यानंतर त्यांना पाथरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषित केले.

यानंतर संतप्त झालेल्या चव्हाण कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह पाथरी येथील SBI बँकेतील शाखेत नेऊन ठेवला. बँक व्यवस्थापनाच्या वेळ खाऊ धोरणामुळे चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप (Farmer died due to heart attack) त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

त्यानंतर कुटुंबियांनी बँका व्यवस्थापनाच्या कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच बँक परिसरात गावातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान चव्हाण कुटुंबियांनी नातेवाईकांना बँक व्यवस्थापनला यासाठी दोषी धरले आहे.

Published On - 9:40 pm, Wed, 18 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI