दोन्ही पायाने अपंग, मतदानासाठी नदी पोहून पार, राज्यातील सर्वात आदर्श मतदार!

गडचिरोली जिल्ह्यात एका व्यक्तीने दोन्ही पायाने दिव्यांग असतानाही नदी ओलांडून मतदानाचे (Physical challenge voter in Gadchiroli) कर्तव्य निभावले.

दोन्ही पायाने अपंग, मतदानासाठी नदी पोहून पार, राज्यातील सर्वात आदर्श मतदार!

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे मतदान नुकतंच पार पडले. तरुणांपासून अगदी शंभरी पार केलेल्या अनेकांनी मतदानाचा हक्क (Physical challenge voter in Gadchiroli) बजावला. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एका व्यक्तीने दोन्ही पायाने दिव्यांग असतानाही नदी ओलांडून मतदानाचे (Physical challenge voter in Gadchiroli) कर्तव्य निभावले. त्यामुळे तो गडचिरोलीतील सर्वात आदर्श मतदार ठरला आहे.

हा मतदार भामरागड तालुक्यातील तुमरकाठी येथे राहतो. त्यांनी नदी पूल नसल्याने ती पोहत पार केली. त्याशिवाय 7 कि.मी पायदळी प्रवास करत तो कोठी मतदान केंद्रावर पोहोचला.

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोठी, तुमरकाठी या गावात रस्ते नाही. तसेच या गावात कोणतीही विद्युत किंवा दूरध्वी सेवाही नाही. तसेच या गावातून दुसऱ्या गावातच जाण्यासाठी नदी लागते. मात्र या नदीवर पूल नसल्याने ती ओलांडून जावं (Physical challenge voter in Gadchiroli) लागतं.

दरम्यान या मतदाराच्या जिद्दीला पाहून शहरी तसेच सदृरुढ मतदारांना चांगलीच चपराक लावली आहे. तसेच जे राष्ट्रीय कर्तव्य बजावत नाहीत त्यांनीही या मतदाराने मतदान करण्याचे आवाहन केलं.

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाले. तर सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

राज्यात 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 पुरुष, 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 स्त्रिया आणि 2 हजार 637 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदार आहेत. यापैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये 2 कोटी 94 लाख 73 हजार 184 पुरूष, 2 कोटी 53 लाख 64 हजार 665 स्त्रिया आणि 666 तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI