PM Narendra Modi | “मेरे प्यारे देशवासियों…!” पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी चार वाजता संबोधणार

भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

PM Narendra Modi | मेरे प्यारे देशवासियों...! पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी चार वाजता संबोधणार
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 11:32 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार 30 जून) दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा, अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात कोणत्या शिथिलता मिळणार आणि कोणती बंधने अधिक कठोर होणार याची उत्सुकता एकीकडे आहे. तर दुसरीकडे भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (PM Narendra Modi Address to Nation)

अनलॉक-2 ची नियमावली जारी

केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता इतर गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात आली. त्याशिवाय, रेड झोनमधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहेत. येत्या 1 जुलैपासून अनलॉक-2 चे नियम लागू होतील. टप्प्या-टप्प्याने देशात अनलॉकची प्रक्रिया राबवली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी

भारत-चीन सीमारेषा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अ‍ॅपचा समावेश आहे.

‘मन की बात’मधून चीनला सडेतोड उत्तर

रविवारी (28 जून) मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी लडाखमधील भारत-चीन तणाव, कोरोना यासह विविध विषयांवर भाष्य केलं होतं. भारताला जशी मैत्री निभावता येते, तशीच कुणी वाकडी नजर करुन पाहिल्यास जशास तसे उत्तरही देता येतं. भारताने लडाखमध्ये देशाच्या सीमेचं चोख रक्षण केलं आणि चीनला सडेतोड उत्तर दिलं, असं मोदींनी यावेळी म्हटलं होतं. (PM Narendra Modi Address to Nation)

“कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन लागू करण्यात आला. आता आपण अनलॉकच्या टप्प्यात आहोत. या काळात आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल. तुम्ही मास्क घातले नाही, इतर नियम पाळले नाही तर अनेकांचं आरोग्य धोक्यात येईल. म्हणून सर्व देशवासीयांना मी बेजबाबदारपणा टाळण्याचं आवाहन करतो.” असे मोदी मन की बातदरम्यान म्हणाले होते.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच

दरम्यान देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. सध्या भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचला आहे. तर यातील 16 हजार 475 कोरोनाबळी गेले आहेत. जगभरात कोरोनाच्या आकडेवारी भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (

संबंधित बातम्या : 

Chinese Apps Ban | Tik Tok, Share IT सह चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, वाचा संपूर्ण यादी

Unlock-2 Guidelines | केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची नियमावली जारी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

Mann Ki Baat | भारत मैत्री निभावतो, तसा वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शेजाऱ्यांना उत्तरही देतो, मोदींचा थेट इशारा

(PM Narendra Modi Address to Nation)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.