पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय : प्रकाश आंबेडकर

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय, अशी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय : प्रकाश आंबेडकर

पाटणा : “पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठवताना केंद्राने काही गाईडलाईन दिल्या होत्या, त्यादेखील मान्य करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली असून महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा”, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. (Prakash Ambedkar Slam Uddhav thackeray Government)

“लॉकडाऊन नंतर इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे. इतर राज्यांनी लॉकडाऊन उठवताना केंद्राच्या गाईडलाईनचा आधार घेतला होता. मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या गाईडलाईन्स मान्य करायला तयार नाही”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.

“शिवाय महाराष्ट्र सरकारने अद्यापही लॉकडाऊन पूर्णपणे उठविला नाही. राज्यातील मंदिरं बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभं करावं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महाराष्ट्र सरकार हे अगोदर पुरोगामी सरकार होतं. परंतु आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलंय. केंद्राच्या गाईडलाईन्स महाराष्ट्र शासन मान्य करायला का तयार नाहीये? इतर राज्यांनी मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतलाय मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला नाही. मंदिरं बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे.”

राज्याची आर्थिक स्थिती कशी सुधारेल हे सरकारने पाहिलं पाहिजे. मात्र सरकार या दिशेने कोणतीही पावलं टाकताना दिसून येत नाही. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभं करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

(Prakash Ambedkar Slam Uddhav thackeray Government)

संबंधित बातम्या

प्रकाश आंबेडकर बिहार विधानसभेच्या मैदानात!, ‘प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी’सोबत हातमिळवणी

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई: प्रकाश आंबेडकर

उदयनराजेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका, संभाजी भिडेंची प्रतिक्रिया काय?

Published On - 4:24 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI