AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला सरकार जबाबदार : प्रविण दरेकर

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे (Pravin Darekar criticize state government for corona).

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला सरकार जबाबदार : प्रविण दरेकर
| Updated on: Jun 07, 2020 | 12:50 AM
Share

अहमदनगर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार 100 टक्के अपयशी ठरले आहे. तसेच कोरोनाबाबत राज्य सरकार फक्त केंद्राच्या मदतीकडे पाहत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे (Pravin Darekar criticize state government for corona). ते अहमदनगर आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील आरोग्य यंत्रणा व्यवस्थित सेवा देत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विरोधी पक्षातील कोणी काही बोललं तर राजकारण करतात असं सरकारकडून बोललं जात आहे. मात्र, आपलं अपयश दाखवण्यासाठी सरकार हा प्लॅन करत असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला.

केरळ सरकारने कोरोनावर उपाययोजना करताना स्वतः 20 हजार कोटी रुपये खर्च केले. राज्य सरकार मात्र केंद्राने मदत दिली नाही अशी ओरड करत असल्याचे दरेकर यांनी म्हटलं. त्याचबरोबर राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबत राज्यपाल सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात, तेच निर्णय घेतील. मात्र 40 ते 50 टक्के विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे. त्यामुळे सरासरी पद्धतीने निकालाचा विचार केला, तर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा नुकसान होईल. त्यामुळे सगळा विचार करुन निर्णय घ्यावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे, पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल, असं मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यात येणारे बी-बियाणे योग्य वेळेत पोहचू द्या आणि कापूस, हरभरा, मका, तूर आदी धानाची खरेदी गतीने करण्याची सूचना दरेकर यांनी यावेळी केली.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अहमदनगर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थिती संदर्भात जिल्ह्यातील कृषी आणि वैद्यकीय विभागाचे अधिकारी, तसेच पोलिस यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाची स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Corona Udpates : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

आवरणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाचा कोणताही धोका नाही, सेवाग्राममधील डॉक्टर खांडेकरांचा दावा

कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अजित पवारांचे आदेश

उद्धव काकांचं ऐकणार की नाही? आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय? मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन

Pravin Darekar criticize state government for corona

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.