आवरणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाचा कोणताही धोका नाही, सेवाग्राममधील डॉक्टर खांडेकरांचा दावा

रुग्णालयाने दिलेल्या आवरणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहापासून कोणताही धोका नसल्याचा दावा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. इंद्रजित खांडेकरांनी केला आहे (Coated death body of corona patient risk).

आवरणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाचा कोणताही धोका नाही, सेवाग्राममधील डॉक्टर खांडेकरांचा दावा

वर्धा : कोरोना रुग्णांचा मृतदेह नातेवाईक स्वीकारतच नाहीत. परंतु रुग्णालयाने संमती दिलेल्या आवरणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहापासून कोणताही धोका नसल्याचा दावा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. इंद्रजित खांडेकरांनी केला आहे (Coated dead body of corona patient risk). डॉ. खांडेकर यांनी अशा मृतदेहाला पीपीइ किटशिवाय स्पर्श करु देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रातून केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वेष्टनातील मृतदेहाला स्पर्शसुद्धा करण्याचे नाकारणाऱ्या नातेवाईकांची उदाहरणे मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. हा असा गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: प्रात्यक्षिक देण्याची तयारी डॉ. खांडेकर यांनी दाखवली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली आहे.

कोविड-19 ची चाचणी प्रयोगशाळा असणाऱ्या सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयात न्याय वैद्यकशास्त्र विभागात कार्यरत डॉ. खांडेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलांसाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. डॉक्टरांचे हस्ताक्षर, शवविच्छेदन अहवाल, एमबीबीएसच्या अभ्यासक्रमातील बदल व अन्य स्वरुपात सुधारणा करण्यात डॉ. खांडेकर यांचे योगदान राहिले आहे. माहिती अधिकार कायद्यातून त्यांनी अनेक त्रुटी निदर्शनास आणून जनहित याचिकांच्या माध्यमातून त्या दूर केल्या. आता कोरोना साथीतही मृतदेहाची विटंबना होत असल्याबद्दल त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा दाखला देत विटंबना टाळण्याचे उपाय सुचवले आहेत.

कोरोनाबाधित मृतदेहाची विटंबना होत असल्याची उदाहरणे पुढे येत आहे. संक्रमित मृतदेहाचे अंत्यसंस्कार रोखण्याच्या घटना देशभरात घडत आहेत. भीतीपोटी नातेवाईक रुग्णालयाने शासकीय नियमानुसार योग्य आवरणात बांधून दिलेल्या मृतदेहाला स्पर्श करण्याचे टाळत आहेत. मृतदेह रुग्णवाहिकेत हलवताना किंवा अंत्यसंस्कारावेळी चितेवर ठेवताना किंवा दफन करताना स्पर्श करण्याचे नाकारत आहे. त्यामुळे रुग्णालयीन कर्मचारी किंवा पोलिसांना ही कामे करावी लागत आहेत. यामुळे मृत शरीराच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना दुर्दैवी असल्याचं मत डॉ खांडेकर यांनी व्यक्त केलं आहे.

खांडेकर म्हणाले, “मृत व्यक्तीच्या नातलगाकडूनही अमानुष प्रकारे मृतदेह हाताळलं जात आहेत. शासनाने काही ठिकाणी संक्रमित मृतदेह स्मशानभूमीत हाताळण्यासाठी पीपीई घातलेले परिचारक नियुक्त केले आहे. त्यामुळे देखील मृतदेहापासून खूप धोका असल्याचा चुकीचा संदेश समाजात जात आहे. रुग्णालयाने योग्यरितीने पॅक केलेल्या मृतदेहाला हाताळण्यासाठी पीपीईची सुद्धा गरज नाही.” फक्त मृतदेहाशी थेट संपर्क नको आणि त्याचे चुंबन आदी स्पर्श नको, हेच जनतेला माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण स्वत: पीपीईविना नियमबद्ध मृतदेहास स्पर्श करुन दाखवण्यास तयार आहोत, त्यास परवानगी मिळावी, असे आवाहन डॉ. खांडेकर यांनी केले आहे. डॉ. खांडेकर न्याय वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ असून विविध प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित असलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना त्यांचा वारंवार संपर्क होतो. त्यामुळेच नागरिकांची भीती दूर करण्यासाठी त्यांनी स्वत: पुढे येण्याचे ठरवले.

संबंधित बातम्या :

Corona Udpates : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अजित पवारांचे आदेश

उद्धव काकांचं ऐकणार की नाही? आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय? मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन

Coated dead body of corona patient risk

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *