स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी, पण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच : प्रविण दरेकर

"स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे", असा घणाघात दरेकर यांनी केला (Pravin Darekar on Government new GR about opposition leaders meet with official).

स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी, पण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच : प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 12:09 AM

मुंबई : विरोधी पक्षनेत्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेता येणार नाही. राज्य सरकारकडून याबाबत जीआर जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सडकून टीका केली. “स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे”, असा घणाघात दरेकर यांनी केला (Pravin Darekar on Government new GR about opposition leaders meet with official).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यातील विविध शहरांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान फडणवीस आणि दरेकर यांनी अधिकाऱ्यांच्यासोबत बैठका घेऊन माहिती घेतली. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशात अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बंधनं घालण्यात आली आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“विरोधी पक्षनेत्यांनी कुठे जाऊ नये आणि माहिती घेऊच नये, असा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यामातून केला आहे. पण कोबंडं झाकलं तरी सुर्य उगवायचा राहत नाही”, असा घणाघात प्रविण दरेकर यांनी केला.

“विरोधी पक्षनेत्यांना अनेक व्यासपीठे आहेत. सरकारच्या विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन लोकांना न्याय देण्याची भूमिका अधिक आक्रमतेने आम्ही यापुढेही करु, असं आश्वासन आम्ही कोट्यवधी जनतेला देतो”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“विरोधी पक्षनेते या जबाबदारीच्या पदाला मर्यादा आणण्याचे प्रयत्न सरकारकडून होत आहे. गेले काही दिवस कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गांभीर्याने पावलं टाकणं गरजेचं होतं. राज्य सरकारने आणि सरकारमधील पालकमंत्र्यांनी योग्य नियोजनाची, बैठकीची आवश्यकता होती. पण फक्त कोरोनाला घाबरुन अशा प्रकारचे नियोजन केले नाही”, अशी टीका दरेकर यांनी केली

“कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी राज्यात दौरे केले. हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर या ठिकाणी भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन जी निरिक्षणे आली ती निरिक्षणे आणि त्यावरील उपाययोजना राज्य सरकारला सादरही केली. तेथील शासकीय यंत्रणा गतिमान करण्याचा प्रयत्नही केला. पण सरकारला आपले काम जमले नाही, सरकार नियोजन करु शकले नाही”, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.