इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोनाचा शिरकाव, प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना संसर्ग

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Mar 25, 2020 | 4:59 PM

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. आता इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोना संसर्गाने शिरकाव केला आहे. 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona Virus infection to Prince Charles of England).

इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोनाचा शिरकाव, प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना संसर्ग

Follow us on

लंडन : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. आता इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोना संसर्गाने शिरकाव केला आहे. 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona Virus infection to Prince Charles of England). त्यामुळे इंग्लंडमध्ये एकच खळबळ माजली आहे. चार्ल्स यांना कोरोनाच्या प्राथमिक टप्प्यातील काही लक्षणं दिसत आहेत. मात्र त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याची माहिती चार्ल्स यांच्या प्रवक्त्याने दिली आहे.

कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांना बालमोरल येथे स्व विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रिन्स चार्ल्स मागील काही दिवसांपासून घरातूनच काम करत आहेत, अशीही माहिती इंग्लंडच्या सरकारी प्रवक्त्यांनी दिली.

इंग्लंड सरकारच्या अधिकृत माहितीपत्रात म्हटलं आहे, “प्रिन्स चार्ल्स यांना कुणाकडून कोरोना विषाणूचा संसर्ग झाला हे निश्चितपणे सांगणे अशक्य आहे. मागील आठवड्यात सार्वजनिक कामांनिमित्ताने त्यांचा मोठ्या प्रमाणात लोकांशी संपर्क आला आहे. त्यामुळे असं निश्चित करणं शक्य नाही.”

द डचेस ऑफ कॉर्नवॉल (72) यांचीही कोरोना संसर्गाची चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं चाचणीत स्पष्ट झालं.

संबंधित बातम्या :

चीनमधील ‘हुबेई’चे लॉकडाऊन 60 दिवसांनंतर हटवले, नागरिकांच्या साथीने ‘कोरोना’ आटोक्यात

Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचं थैमान, चीन, इटलीनंतर स्पेन आणि इराणमध्येही हाहाकार, कोणत्या देशात किती मृत्यू?

Corona Virus infection to Prince Charles of England

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI