सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला ‘कोरोना’, पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन

सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला 'कोरोना', पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन

शिक्रापूर परिसरातील सोनोग्राफी सेंटर आजूबाजूचा गावातील गर्भवती तपासणीसाठी जात होत्या, मात्र रेडिओलॉजिस्ट 'कोरोना' पॉझिटिव्ह आल्यामुळे 144 जणींवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे (Pune 144 Pregnant Women Quarantine)

अनिश बेंद्रे

|

Apr 15, 2020 | 9:43 AM

पुणे : पुण्यात शिक्रापूर परिसरामध्ये 144 गर्भवतींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आल्यामुळे या गरोदर महिलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. (Pune 144 Pregnant Women Quarantine)

पुण्यात दिवसेंदिवस ‘कोरोना’चा विळखा वाढताना दिसत आहे. शिक्रापूर परिसरात असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर आजूबाजूचा गावातील गरोदर महिला नियमित तपासणीसाठी जात होत्या. मात्र इथे रेडिओलॉजिस्ट असलेल्या व्यक्तीला ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं.

69 गर्भवती महिलांनी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रेडिओलॉजिस्टकडून तपासणी केली होती, तर 75 महिलांचा रेडिओलॉजिस्टशी थेट संपर्क आला नव्हता. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव सर्व 144 गर्भवतींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

शिक्रापूर परिसरातील 31 गावांमधील गरोदर महिलांचा यामध्ये समावेश आहे. मात्र शिक्रापूरमधील सर्वाधिक गर्भवती यामध्ये आहेत. ‘कोरोना’ग्रस्त रेडिओलॉजिस्टच्या संपर्कात आलेल्या सर्वांचं ट्रेसिंग सुरु आहे. खबरदारी म्हणून थेट संपर्क आलेल्या सर्वांनाच क्वारंटाईन केलं जाण्याची शक्यता आहे.

सोनावणे हॉस्पिटलचे डॉक्टरही क्वारंटाईन

दरम्यान, पुण्यातील सोनावणे हॉस्पिटलचे 3 डॉक्टरही सध्या विलगीकरणात आहेत. तीन डॉक्टर, 9 नर्सेस यांच्यासह एकूण 17 जणांना क्वारंटाईन केलं आहे. कोरोनाबाधित गर्भवतीशी संपर्क आल्याने या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुण्यातील ‘ही’ पाच रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी निश्चित

पुण्यात काल कोरोनाचे 65 नवे रुग्ण आढळले आहेत. ससून हॉस्पिटलमधल्या 3 नर्सेससह 21 जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. आता पुण्यातली एकूण रुग्णसंख्या 343 वर पोहोचली आहे. पुण्यात कोरोनाचे आतापर्यंत 35 बळी गेले आहेत.

(Pune 144 Pregnant Women Quarantine)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें