पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण, आईचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

पुण्यातील भाजपाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण झाली (Pune BJP MLA Mukta Tilak Corona Positive)  आहे.

पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण, आईचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 11:00 PM

पुणे : पुण्यातील भाजपाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुक्ता टिळक यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. (Pune BJP MLA Mukta Tilak Corona Positive)

“आज माझा आणि माझ्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आमच्या दोघींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही घरातच सेल्फ आयसोलेशनमध्ये असून होम क्वारंटाईन आहोत. दरम्यान कुटुंबियातील अन्य सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे,” अशी माहिती मुक्ता टिळक यांनी दिली.

“भाजपाच्या पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त कळले. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असूनही मुक्ताताई सतत लोकांच्या मदतीसाठी कार्यरत होत्या. महापौरपदी असतानाही मुक्ता ताईंनी जनतेच्या मनात घर केले होते. त्यामुळे सर्व पुणेकरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुम्ही लवकरच बऱ्या होऊन पुन्हा जनसेवेसाठी हजर राहाल, असा विश्वास व्यक्त करतो.” असे ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

दरम्यान मुक्ता टिळक यांचे वडील वसंत लिमये यांचे 3 जुलैला कोरोनामुळे निधन झाले होते. तर इतर सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही पुढील 14 दिवस आम्ही होम क्वारंटाईन असणार आहोत, असे ट्विट मुक्ता टिळक यांनी केले होते. त्यानंतर आज त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

मुक्ता टिळक पुण्याच्या माजी महापौर आहेत. गेल्यावर्षी कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या. (Pune BJP MLA Mukta Tilak Corona Positive)

संबंधित बातम्या : 

CORONA | औरंगाबादेत कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू

BJP MLA Rahul Kool Corona | दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.