अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन दिवस म्हणजे 22 ते 23 एप्रिल रोजी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात (Pune Corona Virus Update) आले आहेत. मात्र, या निर्बंधालाही काही भागात पुणेकरांनी हरताळ फासला आहे.

चेतन पाटील

|

Apr 22, 2020 | 12:25 PM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन दिवस म्हणजे 22 ते 23 एप्रिल रोजी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात (Pune Corona Virus Update) आले आहेत. हे निर्बंध आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहेत. मात्र, या निर्बंधालाही काही भागात पुणेकरांनी हरताळ फासला आहे. स्वारगेटच्या एका चिकन दुकानदाराने अतिरिक्त निर्बंध असूनही दुकान उघडलं. या दुकानाबाहेर  नागरिकांनी चक्क रांग लावली. पोलिसांनी या चिकन दुकानदाराला चांगलाच चोप दिला (Pune Corona Virus Update).

पुणेकरांनी किराणा खरेदीसाठीदेखील प्रचंड गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे. दुकानाबाहेर बेशिस्तपणे लोकांच्या रांगा लागत आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना धुडकावून या रांगा लागल्या आहेत. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र काही पुणेकर यामध्ये खोडा घालताना दिसत आहेत.

पुण्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहे. नुकतंच केंद्रीय पथकाने पुण्यातील उपाययोजनांची पाहणी केली. त्यानंतर पुण्यातील कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी दोन दिवस अतिरिक्त निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधानुसार जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकान बंद ठेवण्यात येणार आहे. त्यादरम्यान फक्त दूध विक्री केंद्र सुरु राहणार आहेत, असे आदेश सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

या दोन दिवसात जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणामाल, भाजीपाला, फळे, चिकन, मटन, अंडी ई-कॉमर्स यांची विक्री केंद्र दुकाने वितरण सेवा पूर्ण बंद राहील. तर दूध विक्री केंद्र सकाळी दोन तास म्हणजे 10 ते 12 पर्यंत सुरू राहतील. दुधाच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र घरपोच दूध वितरण आणि दुकानातून होणाऱ्या दूध विक्रीवर वेळेचे बंधन राहील.

दूध विक्री केंद्रावर गर्दी टाळावी उपायोजना राबवणं बंधनकारक आहे. अन्यथा केंद्र बंद केले जाईल. तर पोलीस, संरक्षण, आरोग्य दवाखाना, औषध, अत्यवस्थ रुग्णाची वाहतूक, कोरोना संदर्भात पालिका आणि शासकीय सेवा, त्याचबरोबर शहर पोलिसांनी दिलेले डिजीटल पास यांना निर्बंध नसतील, असेही यात नमूद करण्यात आलं आहे.

‘या’ भागात अतिरिक्त निर्बंध

  • समर्थ पोलीस स्टेशन
  • खडक पोलीस स्टेशन
  • स्वारगेट पोलिस स्टेशन- गुलटेकडी, महर्षी नगर आणि डायस प्लॉट
  • बंडगार्डन पोलीस स्टेशन
  • ताडीवाला रोड
  • दत्तवाडी पोलीस स्टेशन -जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन परिसर
  • येरवडा पोलीस स्टेशन – लक्ष्मी नगर आणि गाडीतळ
  • खडकी पोलीस स्टेशन – खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
  • कोंढवा पोलीस स्टेशन
  • वानवडी पोलीस स्टेशन- विकास नगर, सय्यद नगर, रामटेकडी चिंतामणी नगर हांडेवाडी

संबंधित बातम्या :

तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात

पुणे पोलिसांचा जालीम इलाज; दोन दिवसांसाठी भाजीपाला-किराणाही बंद; केवळ दूध मिळणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें