दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’मध्ये सहभागी झालेले 199 जण महाराष्ट्रातील, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु

राज्यातील जवळपास 199 जण ही नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम सहभागी झाल्याचे समोर येत (Pune People At Tablighi Jamaat Nizamuddin event) आहे. 

दिल्लीतील 'तब्लिग-ए-जमात'मध्ये सहभागी झालेले 199 जण महाराष्ट्रातील, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु

पुणे : नवी दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी (Pune People At Tablighi Jamaat Nizamuddin event)  गेलेले 136 जण हे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तर 47 जण हे औरंगाबाद शहरातील असल्याची समोर आले आहे. तसेच सोलापूरमधील 16 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामुळे राज्यातील जवळपास 199 जण ही नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम सहभागी झाल्याचे समोर येत आहे. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाचा जीव टांगणीला लागला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सापडलेल्या या  136 जणांचे (Pune People At Tablighi Jamaat Nizamuddin event)  सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. अद्याप यातील कोणत्याही व्यक्तीचा रिपोर्ट आलेला नाही. तसेच यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे .

औरंगाबादेत 47 जणांची तपासणी

तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये या कार्यक्रमातून परतलेले 47 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यातील सात जणांना सोमवारी गांधीनगर भागातील क्रांती चौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या सातपैकी सहाजण हे लग्नाला गेले होते अशीही माहिती पोलिसांनी दिली.

तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. त्यांनाही पोलीस घाटीत भरती करणार आहेत. याशिवाय आणखी कितीजण निजामुद्दीन येथून परतले आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.

सोलापूरमध्ये 16 जणांची वैद्यकीय तपासणी

त्याशिवाय सोलापूरमधील 16 जणही तब्लिग-ए-जमात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यात शहरातील सहा तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे. तसेच या 16 जणांच्या संपर्कात असलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान, या मरकझमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तेथे सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत.

हेही वाचा – दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’ कोरोनाचे प्रसारकेंद्र ठरण्याची भीती, 24 जणांना लागण, नऊ मृत्यू, 200 कोरोना संशयित

निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 350 भाविकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत यापैकी 24 जणांची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तब्लिग-ए-जमातमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 700 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दिल्लीत हजरत निझमुद्दीनमध्ये प्रसिद्ध दर्गा असून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. जमातच्या मुख्यालयात 1 ते 15 मार्च दरम्यान ‘तब्लिग-ए-जमात’ हा कार्यक्रम झाला होता. नमाज अदा करत असताना कोरोनाबाधित व्यक्तीमुळे 200 पेक्षा अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्याची शंका आहे. भाविक सहभागी होऊन मूळगावी परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे.

निमाझमुद्दीनमधील सर्व रहिवाशांना दिल्ली पोलीस बसने जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये तपासणीसाठी घेऊन जात आहेत. यातून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

याआधीच, कार्यक्रमात सहभागी झालेल्या 9 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील सहा जणांचा, तर कर्नाटक, जम्मू-काश्मिर, तामिळनाडूतील प्रत्येकी एकाचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जम्मू काश्मीरमधील 65 वर्षीय नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यानंतर याची पाळंमुळं समोर येऊ लागली. तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगालमधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध उघड होऊ (Pune People At Tablighi Jamaat Nizamuddin event) लागले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI