AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड! एकाच फ्रेममध्ये गांधी कुटुंब अन् अमित शहा; लेकीच्या रिसेप्शनसाठी सुप्रिया सुळेंची लगबग

दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या एकाच फ्रेममध्ये गांधी कुटुंब आणि अमित शहा देखील दिसले.

मोठी घडामोड! एकाच फ्रेममध्ये गांधी कुटुंब अन् अमित शहा; लेकीच्या रिसेप्शनसाठी सुप्रिया सुळेंची लगबग
| Updated on: Aug 11, 2026 | 10:24 AM
Share

संसदेत एकमेकांवर तोफ डागणारे सत्ताधारी आणि विरोधक दिल्लीत एका कार्यक्रमात एकत्र आले. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमाला गांधी कुटुंब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. तर याच कार्यक्रमात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र चर्चा करताना दिसले. दुसरीकडे या कार्यक्रमाला अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या हजेरीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

राजधानी दिल्लीत सोमवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्नाचं रिसेप्शन कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित तर दिग्गज नेत्यांचे व्हिडिओ फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. राहुल गांधी यांनी सहकुटुंब हजेरी लावली. गांधी कुटुंबाने रेवती आणि सारंग यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. अमित शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. नवीन जोडपे आणि अमित शहा यांनी एकत्र फोटो देखील काढले. आता या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. रेवती सुळे यांचं काही दिवसांपूर्वी सारंग लखानी यांच्याशी लग्न झालं. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत करताना दिसले.

तत्पूर्वी, सोमवारी सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या 8 खासदारांसहित पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींसमोर खासदारांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडले. सर्व आठ खासदारांनी त्यांच्या मागणीचं निवेदन पंतप्रधान मोदी यांच्याकडे दिले. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…