Corona : लॉकडाऊनऐवजी वेगळा विचार करा, राहुल गांधींचा मोदी सरकारला सल्ला

देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच लोकांवर, आपल्याच समाजावर आणि आपल्याच अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे.

Corona : लॉकडाऊनऐवजी वेगळा विचार करा, राहुल गांधींचा मोदी सरकारला सल्ला

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi Letter To PM) यांनी देशातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी सरकारला कोरोनाविषयीचे (Corona Virus) काही सल्ले दिले आहेत. देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच लोकांवर, आपल्याच समाजावर आणि आपल्याच अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारने यावर विचार करावा, असं राहुल गांधी (Rahul Gandhi Letter To PM) यांनी या पत्रात म्हटलं आहे.

देशात पूर्णपणे लॉकडाऊन (LockDown In India) करण्याऐवजी गरिबांच्या हिताची काही पावलं उचलायला हवीत. कारण, लॉकडाऊननंतर देशातील सर्वच भागातील गरिबांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत. शनिवारी संध्याकाळी तर दिल्लीतील आनंद विहार येथे आपल्या घरी परतणाऱ्या मजूर-कामगार लोकांची गर्दी उसळली होती. यापूर्वी दिल्ली-गाजियाबाद सीमेवर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. जे आपल्या घरी पायीच निघाले होते.”

“मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच लोकांवर, आपल्याच समाजावर आणि आपल्याच अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला इतर देशांपेक्षा वेगळ्या पद्धतीचं पावलं उचलणं गरजेची आहेत”, असं पत्र राहुल गांधी (Rahul Gandhi Letter To PM) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं.

‘संपूर्ण लॉकडाउनमुळे मृतांचा आकडा वाढेल’

“आपल्या देशात गरिबांची संख्या मोठी आहे. ज्यांचं तळहातावर पोट आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे कोविड -19 विषाणूचा आपल्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल आणि मृत्यूची संख्या लक्षणीय वाढेल. त्यामुळे वृद्ध आणि अशा लोकांना प्रथम वेगळे करणे, ज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. तसेच, तरुणांना एकमेकांच्या जवळ जाण्याचा धोका समजावून सांगितला पाहिजे”, असंही राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलं.

‘आर्थिक मदतीची घोषणा हे एक चांगलं पाऊल’

“सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा करणे हे एक चांगलं पाऊल आहे, असंही राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलं. तसेच, ही मदत लवकरात लवकर गरजुंपर्यंत पोहोचण्याची, त्यासाठी याची लवकर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.”

“जास्त लोकसंख्येमुळे आपल्याला मोठ्या संख्येने रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल. अशा परिस्थितीत आपण शक्य तितकी तयारी करणे महत्वाचे आहे. चाचणीची संख्या देखील वाढवा, जेणेकरुन या विषाणूच्या संसर्गाचे वास्तविक चित्र समोर येईल”, असा सल्ला राहुल गांधी (Rahul Gandhi Letter To PM) यांनी पत्राद्वारे मोदी सरकारला दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI