तिकीटाच्या दलालीचे मोठे रॅकेट उघड, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली (Fake aadhar Card during railway reservation) आहे.

तिकीटाच्या दलालीचे मोठे रॅकेट उघड, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

नागपूर : बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली (Fake aadhar Card during railway reservation) आहे. यात 105 प्रवाशांकडून 1 लाख 17 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी चक्क बनावट आधार कार्डाचा वापर करण्याचे एक मोठे रॅकेट यामुळे उघड झाले (Fake aadhar Card during railway reservation) आहे.

दिवाळीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. पण सर्वच प्रवाशांना तिकीट मिळेल आणि तिकीट मिळाल्यावर ते आरक्षित होईल याची शाश्वती नसते. रेल्वेच्या तिकीटाचा काळा बाजार करणाऱ्या दलालांनी हेच ओळखून एक अनोखी शक्कल लढवली. एखाद्या गाडीचे तिकीट हे दलाल सुमारे 3 ते 4 महिन्यांपूर्वीच बनावट नावाच्या आधारे बुक करायचे.

त्यानंतर गरजू प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटामागे जादा पैसे घेऊन ते विकले. महत्त्वाची बाब म्हणजे त्या प्रवाशांच्या खऱ्या नावाऐवजी त्यांची बनावट ओळख तयार करण्यात आली. त्यासाठी त्यांना एक बनावट आधार कार्ड तयार करुन ते देण्यात आलं. ज्या नावाने या दलालांनी चार महिन्याआधी तिकीट बुक केले होते. त्या नावाने हे आधार कार्ड बनवण्यात आले.

याबाबतची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 3 नोव्हेंबरला नागपूरहून सुटणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस आणि पुणे गरीबरथ एक्सप्रेस या दोन्ही ट्रेनमध्ये छापा टाकला. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाने 105 प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

यावेळी ज्या आधार कार्डाचा वापर करण्यात आला होता. त्यावरील नाव आणि आधार क्रमांक खरा होता. मात्र त्यावरील फोटो हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा होता. आधार कार्डवरील क्यूआर कोडची तपासणी सुरक्षा दलाच्या जवानांनी ते आधार कार्ड इतर कोणत्या तरी व्यक्तीचे असल्याचे समोर (Fake aadhar Card during railway reservation) आले.

त्यानंतर जवळपास चार महिन्यांपूर्वी या दोन्ही गाड्यांचे तिकीट बुकींग मोठ्या प्रमाणात झाले होते. एकाचवेळी अशाप्रकारे तिकीट बुकिंग झालेल्या सीटची ओळख पटवण्यता आली. यानंतर 3 नोव्हेंबर ला दोन्ही गाड्यात सुरक्षा दल्याच्या जवानांनी अशा बेकायदा आणि बनावट आधार कार्डच्या सहाय्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवली.

त्यावेळी पुणे गरीबरथ एक्सप्रेसमधून 44 तर दुरांतो एक्सप्रेसमधून 61 प्रवाशांना ताब्यात घेत दंड वसूल करण्यात आला. यात अनेक महिला, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने सध्या त्यांच्याकडून केवळ दंड वसूल करण्यात आला.

दिवाळी आणि सणासुदीच्या काळात तिकीट विक्री करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. अशा बनावट आधार कार्डचा वापर करुन तिकीट विक्री करणारे देखील आता सक्रीय झाले आहेत. आतापर्यंत 10 दलालाची ओळख सुरक्षा दलाने केली असून त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI