निलेश साबळेंच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा, खासदार संभाजीराजेंकडून माफीची मागणी

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजेंनी डॉ. निलेश साबळेंना माफी मागण्यास सांगितलं आहे. Chhatrapati Sambhajiraje Nilesh Sabale

निलेश साबळेंच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा, खासदार संभाजीराजेंकडून माफीची मागणी

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेचे सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. ‘चला हवा..’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला आहे. (Chhatrapati Sambhajiraje demands apology of Nilesh Sabale)

‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे.’ असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे.

‘निलेश साबळे तसेच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’ असा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे.

‘आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रुपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही, की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’ अशी खंतही संभाजीराजेंनी व्यक्त केली. (Chhatrapati Sambhajiraje Nilesh Sabale)

Chhatrapati Sambhajiraje demands apology of Nilesh Sabale

हेही वाचा : छत्रपती संभाजी राजेंची शिवसेना खासदारावर स्तुतिसुमनं, पवार कुटुंबावर निशाणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI