नागपूरमध्ये कोरोनाच्या जनजागृतीसाठी स्वतंत्र वेबपोर्टल. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

सोशल मीडियावरील कोरोनाच्या अफवांवर नियंत्रणासाठी नागपूरमध्ये स्वतंत्र वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे (Webportal for Corona information).

नागपूरमध्ये कोरोनाच्या जनजागृतीसाठी स्वतंत्र वेबपोर्टल. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, सोशल मीडियावरील अफवांमुळे भीतीच्या वातावरणात वाढ होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी नागपूरमध्ये स्वतंत्र वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे (Webportal for Corona information). ‘कोरोना’बाबत जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या कक्षात या वेबपोर्टलचं लोकार्पण केलं.

कोरोनामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात अफवांमुळे नागरिकांमध्ये वाढत असलेली दहशत रोखण्याचं मोठं आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जनजागृतीचे सर्व उपाय केले. याअंतर्गत शहरातील सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी तयार केलेल्या www.fightagainstcorona.social या वेबपोर्टलचं लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केलं.

“सोशल मिडियावर कोरोनाबाबत नागरिकांनी कुठलीही चुकीची माहिती पोस्ट करू नये. सोशल मिडियाचा वापर करीत कोरोनाला ऑनलाईन व ऑफलाईन पसरविण्यापासून थांबविण्याची गरज आहे. या कोरोनाच्या माध्यमातून असामाजिक तत्त्वांना यशस्वी होऊ देऊ नये.”
– अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक

अजित पारसे यांनी तयार केलेलं वेबपोर्टल नागरिकांना उपाययोजनासंदर्भात नक्कीच फायद्याचं ठरेल, असा विश्‍वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. या वेबपोर्टलवर मराठी आणि इंग्रजीतून कोरोनाबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची लागण कुणाला होऊ शकते, कशाप्रकारे होऊ शकते, लक्षणे आदीची माहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे.

“नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. कोरोनाबाबत कुणीही अफवा, खोटे वृत्त, माहिती पसरवू नये. नागरिकांनी संयम बाळगत कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे. नक्कीच कोरोनावर मात करता येईल.”
– रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.

जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वं आणि उपाययोजनांचीही माहिती या वेबपोर्टलवर देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष काय करावे, काय करू नये, याची माहिती या वेबपोर्टलवर देण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेच्या नियंत्रण कक्षाचा क्रमांक, राज्य शासनाचा हेल्पलाईन क्रमांक, नियंत्रण कक्षाचा क्रमांक आदी माहिती येथे उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नागरिकांना या वेबपोर्टलवरील माहितीचा उपयोग करण्याचं आणि अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

या पोर्टलवर जगातील कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी एका ‘वर्ल्डोमिटर’द्वारे दिली जात आहे. हे वर्ल्डोमीटर जागतिक आरोग्य संघटनेनं तयार केलं आहे. या वेबपोर्टलवर ‘वर्ल्डोमीटर’द्वारे संशयीत रुग्ण, गंभीर रुग्ण, उपचाराननंतर बरे झालेले रुग्ण, मृत्यू झालेल्या रुग्णांची अद्ययावत आकडेवारी देण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

 • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
 • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
 • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
 • नागपूर (1) – 12 मार्च
 • पुणे (1) – 12 मार्च
 • पुणे (3) – 12 मार्च
 • ठाणे (1) – 12 मार्च
 • मुंबई (1) – 12 मार्च
 • नागपूर (2) – 13 मार्च
 • पुणे (1) – 13 मार्च
 • अहमदनगर (1) – 13 मार्च
 • मुंबईत (1) – 13 मार्च
 • नागपूर (1) – 14 मार्च
 • यवतमाळ (2) – 14 मार्च
 • मुंबई (1) – 14 मार्च
 • वाशी (1) – 14 मार्च
 • पनवेल (1) – 14 मार्च
 • कल्याण (1) – 14 मार्च
 • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
 • एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या : 

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण

 

Webportal for Corona information

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI