देशात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस, 102 वर्षांचा रेकॉर्डब्रेक

मुसळधार पावसामुळे देशात गेल्या 102 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक (September rainfall in India) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण 1917 या वर्षानंतर 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस (September rainfall in India) झाला आहे.

देशात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस, 102 वर्षांचा रेकॉर्डब्रेक
Namrata Patil

|

Sep 30, 2019 | 9:40 AM

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी देशात सर्वत्र उशिराने मान्सून दाखल झाला असला, तरी सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस (September rainfall in India) कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे देशात गेल्या 102 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक (September rainfall in India) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण 1917 या वर्षानंतर 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस (September rainfall in India) झाला आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 247.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 1983 च्या सप्टेंबर महिन्यात 255.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यापूर्वी सप्टेंबर 1917 मध्ये 285.6 मिमी पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षी देशात 247.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस नियमित पावसापेक्षा 48 टक्के जास्त आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही 1901 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर यंदा देशात तिसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे.

यंदा देशभरात मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्यात देशात 33 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे यंदा पावसाने गेल्या 25 वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली.

देशात चार-पाच दिवसांपासून मान्सूनच्या परतण्याचे कोणतेही संकेत दिसत नाही. गेल्या दोन महिन्यात मॉन्सूनने नॉन स्टॉप बॅटींग केली आहे. यंदाच्या वर्षात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात 31 वर्षातील सर्वाधिक पाऊस पडला आहे. तसेच जर अशाचप्रकारे पाऊस पडत राहिला, तर 1961 मधील म्हणजे 58 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मध्य भारतात सर्वाधिक पाऊस पडला आहे. देशात सुरुवातील 20 टक्के कमी पाऊस पडला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण 28 टक्के वाढले आहे. दक्षिण भारतातही 19 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाणे 30 टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटी या ठिकाणी पावसाचे प्रमाण 16 टक्क्यांनी वाढले आहे. उत्तर पश्चिम भारतात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. तर हरियाणा, दिल्ली आण पूर्वी उत्तर प्रदेशात सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें