बलात्काराचा पुरावा नष्ट करायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

एका सामाजिक आश्रमात काम करणाऱ्या 52 वर्षीय महिलेवर भर रस्त्यात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली (Rape case in kalyan) आहे.

बलात्काराचा पुरावा नष्ट करायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

कल्याण : एका सामाजिक आश्रमात काम करणाऱ्या 52 वर्षीय महिलेवर रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली (Rape case in kalyan) आहे. कल्याण मुरबाड रोडवरील पाचवा मैल परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेवर दारुच्या नशेत बलात्कार करणार बस चालकाला टिटवाळा पोलिसांनी बेड्या (Rape case in kalyan) ठोकल्या आहेत. लखन देवकर असे आरोपीचे नाव आहे.

उल्हासनगरमध्ये राहणारी एक 52 वर्षीय महिला कल्याण मुरबाड रोडवरील असलेल्या एका आश्रमात सेवेकरीचे काम करते. महिलेचा पती तिला सोडून जर्मनीला निघून गेला आहे. महिला एकटीच जीवन जगत असल्याने आश्रमात सेवेचे काम करते. तिला त्या बदल्यात आश्रमातच दोन वेळेचे जेवण मिळते. ती दररोज उल्हासनगरहून आश्रमात पायी ये जा करते. सोमवारी 23 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे महिला रात्री पावणेनऊच्या सुमारास आश्रमातून घरी जाण्यास निघाली. त्यावेळी अचानक रस्त्यात एक तरुण तिच्या समोर आला. त्याने जबरदस्ती करत त्या महिलेला शेजारी वाढलेल्या गवतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या नंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेने (Rape case in kalyan) पोलिसांत धाव घेतली.

यानंतर टिटवाळा पोलिसांना याप्रकरणी तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी मैल परिसरात काही तरुणांची चौकशी केली असता, आरोपीचा मित्र पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, लखन हा त्याचा मित्र आहे. घटनेच्या दिवशी लखन त्याच्यासोबत घटनास्थळी गेला होता. त्या ठिकाणी लखन त्याच्या खिशातील पाकीट विसरुन आला होता. इतकंच नव्हे तर लखनकडे एका महिलेची पर्सही होती. त्यावेळी ती पर्स मैत्रिणीची असल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी तपासाची सूत्रे या दिशेने फिरवली. अखेर त्या सेवेकरी महिलेवर बलात्कार करणारा आरोपी दुसरा कोणी नसून लखन देवखर हाच होता. घटनास्थळी बलात्कार केल्यावर तो पिडीत महिलेची पर्स, छत्री,जेवणाचा डबा सुद्धा घेऊन पळाला होता. मात्र असे असताना तो स्वतः आपली पर्स त्या ठिकाणी विसरला होता.

त्यानंतर लखन आपल्या मित्रासोबत परत घटनास्थळी पर्स घ्यायला गेला. पर्स घेतल्यानंतर त्याला काम फत्ते झाले आणि आता मी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार नाही असे लखनला वाटले. लखनकडे सर्व पुरावे होते. मात्र खिशातील पडलेले पाकिट घेण्यासाठी तो आपल्या मित्रासोबत गेला आणि लखन अडकला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI