स्पाइसजेट विमानाच्या काचेला तडा, सेलोटेप चिकटवलेला फोटो व्हायरल

मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानातील प्रवाशांना एक धक्कादायक दृष्य पाहायला मिळालं (Mumbai-Delhi Flight). या विमानातील एका खिडकीचा काच फुटलेला होता आणि विशेष म्हणजे या काचेला बदलण्याऐवजी तो सेलो टेप लावून जोडण्यात आला होता

स्पाइसजेट विमानाच्या काचेला तडा, सेलोटेप चिकटवलेला फोटो व्हायरल

मुंबई : मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानातील प्रवाशांना एक धक्कादायक दृष्य पाहायला मिळालं (Mumbai-Delhi Flight). या विमानातील एका खिडकीचा काच फुटलेला होता आणि विशेष म्हणजे या काचेला बदलण्याऐवजी तो सेलो टेप लावून जोडण्यात आला होता (Spice Jet Plane Broken Window). हे दृष्य पाहून विमानातील प्रवाशांचा धक्काच बसला. याबाबत विमानातील एका प्रवाशाने त्याच्या ट्वीटर हँडलवर विमान कंपनीच्या या हलगर्जीपणाची तक्रार करणीरं ट्वीट केलं. हे विमान गेल्या 5 नोव्हेंबरला मुंबईहून दिल्लीला पोहोचले (Spice Jet Plane Broken Window).

हरिहरन शंकरन नावाच्या व्यक्तीने या प्रकरणी ट्वीटरवर ट्वीट केलं. “स्पाइसजेटच्या फ्लाईट SG8152(VT-SYG) ने मुंबई ते दिल्ली (5 नोव्हेंबर) उड्डाण केलं तेही फुटलेल्या खिडकीसोबत, जी सेलो टेपने जोडण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब नाही का? कुणी ऐकतंय का?”, असं ट्वीट हरिहरन शंकरन यांनी केलं.

हरिहरन शंकरन यांच्या ट्वीटवर स्पाइसजेटने प्रतिक्रिया देत सांगितलं की, प्रवाशांची सुरक्षा त्यांची प्राथमिकता आहे. यावर हरिहरन शंकरन यांनी विचारलं की, त्या खिडकीचा फुटलेला काच सेलो टेपने जोडण्यात आला, म्हणजेच कुणालातरी या फुटलेल्या काचेबाबत माहिती होतं. तरीही तो काच बदलण्यात आला नाही.

हे प्रकरण वाढल्यानंतर स्पाइसजेटने ट्वीट करत यावर स्पष्टीकरण दिलं. “काचेवर जी क्रॅक होती ती आतल्या बाजुने होती. या काचेचा वापर बाहेरील काचेला नुकसान पोहोचू नये यासाठी होतो. त्यामुळे कुठलीही तांत्रिक समस्या उद्भवत नाही. त्या काचेला त्याच दिवशी ठीक करण्यात आलं.”, असं स्पष्टीकरण स्पाइसजेटने दिलं.

स्पाइसजेटच्या या ट्वीटनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. यावर स्पाइसजेटच्या या निष्काळजीपणावर टीका करण्यात येत आहे.

विमानाच्या खिडकीचा काच फुटला तर काय होईल?

हवाई प्रवासादरम्यान जर विमानाच्या खिडकीचा काच फुटला तर मोठी समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत विमानाच्या आतील हवेचा दबाव कमी होईल आणि बाहेरील हवा वेगाने आत शिरेल. त्यामुळे विमानाच्या आतील तापमानात मोठ्याप्रमाणात घट होईल आणि विमानात श्वास घेणंही शक्य होणार नाही. तसेच, विमान जमीनिपासून अधिक उंचीवर असल्यास विमानाचंही मोठं नुकसान होऊ शकतं आणि यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI