ऐन दिवाळीत प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या, पतीने विष घेऊन तर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका पती पत्नीच्या आत्महत्येने हादरुन गेला आहे.

ऐन दिवाळीत प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या, पतीने विष घेऊन तर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका पती पत्नीच्या आत्महत्येने हादरुन गेला आहे. विशेष म्हणजे प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या या जोडप्याला दोन मुले असून ऐन दिवाळीत ती आता पोरकी झाली आहेत. (Suicide Of love marriage Couple in nanded hadgaon)

पती सुभाष बोरकर आणि पत्नी प्रमिला बोरकर असं आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्यामध्ये भांडणं सुरु होती. दिवाळसणासाठी औरंगाबादहून आपल्या गावी आलेल्या या जोडप्यात संशयामुळे वाद झाला होता. त्या वादाचं पुढचं टोक थेट आत्महत्या ठरलं. साता जन्माच्या साथीच्या आणाभाका घेतलेल्या जोडप्याने थेट आत्महत्येचं पाऊल उचललंय. ऐन दिवाळीत आईबाबांच्या आत्महत्येने दोन्ही मुलं कायमची पोरकी झालीयत.

सविस्तर माहिती अशी, दिवाळसणासाठी औरंगाबादहुन आपल्या गावी आलेल्या या जोडप्यात संशयामुळे वाद झाला. यातील पती सुभाष बोरकर आपली पत्नी प्रमिलाला घेऊन कळमनुरी तालुक्यातील भुवनेश्वर इथे गेला. तिथे गेल्यावर सुभाषने विषारी औषध घेऊन जीवन संपवले तर त्याच परिसरात प्रमिलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आठ दिवसानंतर आढळला.

दरम्यान, पती-पत्नीच्या आत्महत्येने हदगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये. असं काय घडलं की दोघांनाही आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागलं, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. (Suicide Of love marriage Couple in nanded hadgaon)

संबंधित बातम्या

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप

भाऊ-बहिणीचा अभ्यासाच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न, बहिणीचा मृत्यू

Published On - 7:27 am, Wed, 18 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI