रविवारी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक

मध्य रेल्वे (Central Railway Megablock) मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर रविवारी (13 ऑक्टोबर) मेगाब्लॉक घेण्यात येत आहे (Sunday megablock timing). तर पश्चिम रेल्वे (Western Railway Megablock) मार्गावरील सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे.

रविवारी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक
लोकल ट्रेन

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway Megablock) मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर रविवारी (13 ऑक्टोबर) मेगाब्लॉक घेण्यात येत आहे (Sunday megablock timing). तर पश्चिम रेल्वे (Western Railway Megablock) मार्गावरील सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या रेल्वे स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावरील मेगाब्लॉक रविवारी सकाळी 9.53 ते दुपारी 2.42 पर्यंत घेण्यात येईल. यादरम्यान सीएसएमटीहून कल्याणला जाणाऱ्या जलद गाड्या या सायन ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. यादरम्यान त्या सर्व स्थानकांवर थांबतील.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव या रेल्वे स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे. रविवारी सकाळी 10.35 पासून ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात दोन्ही दिशेकडील लोकल सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावरुन धावतील.

हार्बर लाईनवर विशेष लोकल धावणार

हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते वाशी या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या लोकल रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत बंद राहातील. सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी,बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही. तसेच, ब्लॉक काळात सकाळी 10.17 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पनवेल,बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल-वाशी-पनवेल अशा विशेष लोकल चालविण्यात येतील.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI