Sushant Singh case : ड्रग्सप्रकरणी एनसीबीकडून सांताक्रूझमधील एकाला अटक, आतापर्यंत 22 जणांना बेड्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने प्रतिबंधित अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे.

Sushant Singh case : ड्रग्सप्रकरणी एनसीबीकडून सांताक्रूझमधील एकाला अटक, आतापर्यंत 22 जणांना बेड्या
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 8:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) प्रतिबंधित अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केस नंबर 16/20 मध्ये गुरुवारी सायंकाळी सांताक्रूझमधील रहिवासी जय मधोक याला अटक केली आहे. याच केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य 19 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 22 झाली आहे. (Sushant Singh case : NCB arrested drug peddler Jai Madhok )

एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे म्हणाले की, मधोक अंमली पदार्थांचे सेवन करत होता, तसेच तो त्याची विक्रीदेखील करत होता. तो एक ड्रग पेडलर असल्याचे समोर आले आहे. मधोक कोकोनसह हॅशची विक्री करतो. या केसमधील अन्य आरोपींनी चौकशीदरम्यान त्याचं नाव घेतलं आहे.

22 जणांना अटक

ड्रग्सप्ररणी एनसीबीने आतापर्यंत तब्बल 22 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांचा समावेश आहे. यांच्यासह ड्रग पेडलर जैद, बासित परिहार आणि अन्य काही जणांचा समावेश आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) 7 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला आहे. तब्बल 28 दिवसानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. याआधी 3 वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

जामिनानंतर रियासमोर कोर्टाच्या तीन अटी

मुंबई हायकोर्टाने रियाला दिलासा असला तरी तिला काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार रियाला तिचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय तिला मुंबईबाहेर जायचे असल्यास परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. चौकशीदरम्यान पोलिस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे.

संबंधित बातम्या

Bollywood Drugs Connection | एनसीबी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा दावा, क्षितीज प्रसादचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

Bollywood Drug Case | अभिनेत्रींनंतर आता तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर

सेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा

दीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले

Drugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता

(Sushant Singh case : NCB arrested drug peddler Jai Madhok )

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.