Tanushree Dutta | नाना पाटेकरांच्या बॉलिवूड पुनरागमनवर तनुश्री दत्ताचा संताप, म्हणाली…

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 2018 मध्ये ‘Me Too’ चळवळींतर्गत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तनुश्री म्हणाली होती की, नाना पाटेकर यांनी 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्याशी गैरवर्तन केले होते.

Tanushree Dutta | नाना पाटेकरांच्या बॉलिवूड पुनरागमनवर तनुश्री दत्ताचा संताप, म्हणाली...
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 4:36 PM

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 2018 मध्ये ‘Me Too’ चळवळींतर्गत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तनुश्री म्हणाली होती की, नाना पाटेकर यांनी 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्याशी गैरवर्तन केले होते. तनुश्री पाठोपाठ अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाविषयी खुलेपणाने बोलल्या होत्या. त्यांनंतर चित्रपट सृष्टीचे वातावरण चांगलेच तापले होते. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बरेच दिवस हे प्रकरण चर्चिले गेले होते.(Tanushree Dutta anger from Nana Patekar’s Bollywood comeback)

बऱ्याच लोकांनी नाना पाटेकर असे करू शकत नाही, असे म्हटले. तर, काहींनी तनुश्री दत्ताला समर्थन दिले. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली आणि नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, या सर्वांमध्ये नाना पाटेकरांना अनेक चित्रपट गमवावे लागले. आता दोन वर्षांनंतर नाना पाटेकर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. मात्र, यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांना ‘हाऊसफुल 3’सह अनेक बड्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर ते पुन्हा काम सुरू करणार आहेत. ते लवकरच फिरोज नाडियादवालाच्या वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत, नाना पाटेकरांना मोठा मंच मिळाल्याबद्दल तनुश्री दत्ता हिने नाराजी व्यक्त करत म्हटले की, ‘माझा छळ करून, माझा अपमान केल्यानंतर, मला आणि माझ्या कुटुंबाला धमकावले, आमच्यावर हल्ले केले. माझ्या घरी गुंड पाठवले. भाड्याने घेतलेल्या गुंडांनी मला धमकावले, माझे फिल्मी करिअर आणि आयुष्य खराब केले. माझ्या न्यायासाठीच्या लढाईनंतर बॉलिवूडमधील बडे निर्माते नाना पाटेकर यांच्यासारख्या माणसाला काम कसे देऊ शकतात?’, असे म्हणत तनुश्री दत्ताने आपला संताप व्यक्त केला. सुशांतच्या न्यायाबद्दल बोलले जात आहे, मला न्याय कुठे मिळाला? मी विनंती करते, या अशा लोकांना परत काम देऊ नका, असे देखील ती म्हणाली. नाना पाटेकर यांच्या विरोधात लढा सुरूच राहणार का? नाना पाटेकरांविरोधात लढा सुरू ठेवण्यावर तनुश्री दत्ता म्हणाली की, ‘मला पैसे भरावे लागतात आणि कोणीही पाठिंबा देत नाही. तेव्हा मी कसे लढू? मला अभिमान वाटतो की, कंगना आणि बाकी काही लोकांचा सध्या सत्याच्या बाजूने लढताना दिसतात.(Tanushree Dutta anger from Nana Patekar’s Bollywood comeback)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.