लोकप्रिय कॉमेडियन वेणू माधव यांचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Sep 25, 2019 | 4:28 PM

मुंबई : तेलगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन वेणू माधव यांचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन झालं (Actor Venu Madhav Died). हैद्राबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना यकृत आणि किडनीचा आजार होता. गेल्या अनेक काळापासून त्यांचा उपचार सुरु होता. मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Actor Venu Madhav Died). […]

लोकप्रिय कॉमेडियन वेणू माधव यांचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन

मुंबई : तेलगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन वेणू माधव यांचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन झालं (Actor Venu Madhav Died). हैद्राबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना यकृत आणि किडनीचा आजार होता. गेल्या अनेक काळापासून त्यांचा उपचार सुरु होता. मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Actor Venu Madhav Died). मात्र, तिथे उपचारादरम्यान बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण तेलगू इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे (Tollywood).

तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ट्वीट करत वेणू माधम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. वेणू माधव यांच्या अंत्यसंस्काराबाबत मात्र अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

“अभिनेता वेणू माधव आता आपल्यात नाही. डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणू यांनी बुधवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वेणू माधव यांच्या निधनाने संपूर्ण टॉलिवूडमध्ये शोकाकूल वातावरण आहे. वेणूचे चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत”, असं ट्वीट मीडिया कन्सल्टंट वामसी काका यांनी केलं.

वेणू माधव यांटा जन्म आंध्र प्रदेशच्या नलगोंडा जिल्ह्यातील कोडाड (Kodad)मध्ये झाला. त्यांनी एक मिमिक्री कलाकार म्हणून आपलं करिअर सुरु केलं होतं. त्यानंतर त्यांनी एक विनोदी अभिनेत्याच्या रुपात तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 1996 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Sampradayam’ हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यांनी तामिळ आणि तेलगूमध्ये जवळपास 200 सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ‘Dr.Paramanandaiah Students’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे. हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

गेल्या काही वर्षांपासून वेणू माधव हे राजकारणातही रस दाखवला. त्यांनी तेलगू देसम पक्षासाठी निवडणूक प्रचारही केला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI