ठाण्यात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या, मृतदेह वाशी खाडीत फेकला, मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

बंगल्याची आणि इतर प्रॉपर्टीच्या वाटणीवरुन मयत राकेश माणिक पाटील आणि मुख्य आरोपी सचिन सर्जेराव पाटील या दोघा सावत्र भावांमध्ये वाद होता.

ठाण्यात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या, मृतदेह वाशी खाडीत फेकला, मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 5:44 PM

ठाणे : संपत्तीच्या वादातून सावत्र भावानेच भावाची गोळी झाडून हत्या (Murder Of Step Brother) केल्याची घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. यामध्ये घरातील सोने देखील लुटण्यात आले होते. राकेश माणिक पाटील असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव होते. या प्रकरणी पोलिसांनी मयत व्यक्तीचा सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील आणि त्याचा साथीदार गौरव राजेश सिंग या दोघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी गौरव सिंहला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. तर या हत्येच्या घटनेतील मुख्य सूत्रधार सचिन पाटील हा फरार होता. त्यास अखेर कासारवडवली पोलिसांनी 26 सप्टेंबर रोजी नवी मुंबई परिसरातून अटक केली (Murder Of Step Brother).

ठाणे मनपा नगरसेवक माणिक बाबू पाटील यांचा जीबी रोड, विजय गार्डन येथे बंगला आहे. या बंगल्याची आणि इतर प्रॉपर्टीच्या वाटणीवरुन मयत राकेश माणिक पाटील आणि मुख्य आरोपी सचिन सर्जेराव पाटील या दोघा सावत्र भावांमध्ये वाद होता. याच वादाच्या कारणातून सचिनने राकेशचा काटा काढण्याचा प्लॅन केला होता.

आरोपी सचिनने आपल्या वडिलांच्या गाडीवर ड्रायव्हर असलेल्या गौरव राजेश सिंह याची मदत घेत राकेशची गोळी झाडून हत्या केली. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मयत राकेशचा मृतदेह वाशी खाडीच्या ब्रिजवरुन पाण्यात फेकून दिला. याच दरम्यान, राकेश अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांच्या मिसिंगची तक्रार 20 सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली (Murder Of Step Brother).

या घटनेचा तपास करीत असताना राकेशची हत्या त्याच्याच सावत्र भावाने केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीचा साथीदार गौरव सिंह यास बुधवारी रात्री अटक केली. तर फरार झालेला मुख्य आरोपी सचिन पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके नेमली होती. तीनही पोलीस पथक आरोपीचा कसून शोध घेत असतानाच मुख्य आरोपी सचिन पाटील हा नवी मुंबईतील उलवे परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार 26 सप्टेंबर रोजी रात्री पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सचिन पाटीलने आपणच सावत्र भावाची गावठी पिस्तूलातून गोळी झाडून हत्या केल्याचे आणि घरातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी अटकेतल्या आरोपीच्या ताब्यातून तीन किलो 700 ग्रॅम वजनाचे सोने, गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतुस आणि एक स्कुटर असा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. दरम्यान, मयत राकेश याचा मृतदेह अद्याप मिळालेला नसून पोलीस अग्निशमनदल, स्थानिक मच्छिमार यांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेत आहेत. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता सचिन यास 4 ऑक्टोबर तर गौरव सिंगला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Murder Of Step Brother

संबंधित बातम्या :

गळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य

Balya Binekar | नागपुरात गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, छतांवरही बघे, दोन हजार जण जमल्याची चर्चा

ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.