Video | नवशिख्या चोराला धाडस नडलं, हेल्मेट चोरायला गेला अन् जाळ्यात फसला, व्हिडिओ व्हायरल

असं म्हणतात की चोराला चोरी करण्याची संधी मिळाली की तो दिवस किंवा रात्र पाहत नाही. योग्य संधी भेटताच तो आपला डाव साधतो. एकापेक्षा एक अशा थक्क करुन सोडणाऱ्या चोऱ्या आपण यापूर्वी पाहिल्या आणि ऐकल्यादेखील असतील. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काहीसं वेगळंच दाखवण्यात आलंय. या व्हिडीओमध्ये एक चोर हेल्मेट चोरायला आला आहे.

Video | नवशिख्या चोराला धाडस नडलं, हेल्मेट चोरायला गेला अन् जाळ्यात फसला, व्हिडिओ व्हायरल
thief viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 21, 2021 | 3:15 PM

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ कधी आपल्याला हैराण करुन सोडतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या तर एक अतिशय मजेदार आणि खळखळून हसवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चोरी करायला गेलेल्या चोराची चांगलीच नाचक्की झाली आहे. चोरी करत असताना आकलन न झाल्यामुळे तो पुरता फसला आहे. (thief trying to steal helmet of sitting man funny viral video went viral on social media)

चोराला वाटले हीच योग्य संधी

असं म्हणतात की चोराला चोरी करण्याची संधी मिळाली की तो दिवस किंवा रात्र पाहत नाही. योग्य संधी भेटताच तो आपला डाव साधतो. एकापेक्षा एक अशा थक्क करुन सोडणाऱ्या चोऱ्या आपण यापूर्वी पाहिल्या आणि ऐकल्यादेखील असतील. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काहीसं वेगळंच दाखवण्यात आलंय. या व्हिडीओमध्ये एक चोर हेल्मेट चोरायला आला आहे. हेल्मेटच्या बाजूला बसलेली व्यक्ती आपल्यातच दंग असल्यामुळे हेल्मेट चोरण्याची हीच योग्य संधी असल्याचे चोराला वाटले आहे.

हेल्मेट चोरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

हा चोर चोरपावलाने हेल्मेटजवळ गेला आहे. त्याने कसलाही आवाज न करता दोन्ही हातांनी हेल्मेट उचलले आहे. मात्र, त्याला काही केलं तरी हेल्मेट उचलत नाहीये. नंतर हेल्मेट घेऊन पळून जाण्यासाठी तो आणखी जोर लावत आहे. मात्र, तरीदेखील यामध्ये तो यशस्वी होत नाहीये. शेवटी हेल्मेट जमिनीवर ठेवलेले नसून ते एका माणसाने डोक्यात घातले असल्याचे चोराला समजले आहे. हा प्रकार अचानकपणे समजल्यावर चोर चकीत झालाय.

पाहा व्हिडीओ 

चोराला पळता भुई थोडी

त्याची चोरी उघड झाल्यावर आता आपले कही खरं नाही, हे चोराला कळून चुकले आहे. त्याला पळता भुई थोडी झालीय. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :

Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

Video | स्विमिंग पूलमध्ये महिला आरामात झोपली, जवळ येताच कुत्र्याने केला भलताच कारनामा, एकदा पाहाच !

Video | टायमिंग परफेक्शनचा मास्टर, पठ्ठ्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणतात ही तर जादू !

(thief trying to steal helmet of sitting man funny viral video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें